मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रास जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट
हिगोली (Turmeric Research Center) : महाराष्ट्रात हळद उत्पादनात हिंगोली जिल्हा अग्रेसर आहे. एकूण हळद उत्पादनात जिल्ह्याचा वाटा १५% पेक्षा अधिक आहे. येत्या ५ वर्षात हळद लागवड क्षेत्र व टप्प्याटप्प्याने उत्पादनात वाढ करण्याचा मानस व्यक्त करत, वाढत्या हळद उत्पादनातून व चांगल्या दरातून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी वसमत येथे आकार घेत असलेले मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र शेतकरी उन्नतीसाठी निश्चितच लाभदायक ठरेल, असा विश्वास (Collector Rahul Gupta) जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी व्यक्त केला.
मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन (Turmeric Research Center) व प्रशिक्षण केंद्रास जिल्हाधिकारी राहूल गुप्ता यांनी ५ जूलै रोजी भेट दिली. यादरम्यान संशोधन केंद्राच्या परिसरात सुरू असलेल्या संपूर्ण कामांची अतिशय बारकाई व आत्मियतेने पाहणी केली. प्रसंगी संशोधन केंद्राचे अध्यक्ष नामदार हेमंत पाटील यांचीही हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने दिशादर्शक असल्याचे आवर्जून सांगितले.
याप्रसंगी संशोधन केंद्राचे संचालक संभाजीराव सिद्धेवार, सदाशीवराव पुंड, लक्ष्मीनारायण मुरक्या, रितेश जुजाराव, शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रल्हाद बोरगड, भगवान इंगोले, मुंबई विद्यापीठाच्या वतीने लोअर दुधना प्रकल्प पाणी व्यवस्थापनासाठी निवडलेल्या संस्थेचे प्रतिनिधी, शेतकरी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन तंत्र अधिकारी रमेश देशमुख यांनी केले.
महत्त्वकांक्षी प्रकल्पातून निश्चितच चांगले काम होणार :- कुलगुरू डॉ. नामदेवराव कल्याणकर
माजी कुलगुरू डॉ. नामदेवराव कल्याणकर यांचीही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या समवेत भेट दिली. यावेळी (Turmeric Research Center) संशोधन केंद्राच्या मदतीने हळद प्रक्रिया, विपणन, वितरण, निर्यात, विविध वाणाचे संशोधन, शेतकरी प्रशिक्षण इत्यादी महत्वपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून चांगले काम सुरू आहे. येत्या काळात हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांक्षी ठरणार असून, महाराष्ट्रातील हळदीचे क्षेत्र वाढविण्यास चालना देणारे आहे. या संशोधन केंद्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देत, त्यांचे मार्गदर्शन व योगदान शेतकऱ्यासाठी मोलाचे ठरेल. तसेच आमदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने होत असलेला प्रकल्प शेतकऱ्यांच्या हळद पीक वाढीसाठी केंद्रबिंदू ठरणार आहे.
एनसीडीएक्स सोबत हळद संशोधन केंद्राचा करार
एनसीडीएक्स सोबत हळद संशोधन केंद्राचा (Turmeric Research Center) सामंजस्य करार करण्यात आला. त्यांच्या माध्यमातून दरवर्षी हळद खरेदी- विक्रेत्यांचे जागतिक स्तरावर हळद परिषद आयोजन करणे, शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, निर्यातदार, खरेदीदार, तज्ञ यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन व चर्चासत्र करणे. संशोधन केंद्राच्या वतीने अनेक राष्ट्रीय स्तरावरील संस्था, कृषी विद्यापीठांसोबत सामंजस्य करार करत, नवनवीन हळदीची वाण विकसित करून हळद उत्पादकता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.