वसमत न्यायालयातील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. हस्तेकर यांनी सुनावला निकाल
हिंगोली (Mahavitran Engineer Case) : महावितरणच्या अभियंत्यास फेबु्वारी २०१५ मध्ये कर्तव्यावर केलेल्या मारहाण प्रकरणात चार आरोपींना वसमत न्यायालयातील जिल्हा सत्र न्यायाधिश आर. आर. हस्तेकर यांनी दोन वर्ष सक्षम कारावास व प्रत्येकी २० हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अॅड. नितीन नायक यांनी दिलेली माहिती अशी की, ७ फेबु्वारी २०१५ रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास महावितरण कनिष्ठ अभियंता संजय मुंढे हे कर्तव्यावर असताना त्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दिपक मुंदडा, राहुल राठोड, दिपक हळवे, अविनाश बोखारे, प्रितेश कोटलवार, विनोद नामपल्ली, काशिनाथ भोसले, व्यंकटेश श्रीनिवार यांच्या विरूध्द वसमत शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
पोलिसांनी तपास करून वसमत जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. ज्यामध्ये सरकार पक्षातर्फे सात साक्षिदारांची साक्ष तपासली. ज्यामध्ये दिपक मुंदडा, राहुल राठोड, काशिनाथ भोसले, व्यंकटेश श्रीनिवार यांचा गुन्हा साक्ष पुराव्याअंती सिध्द झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. आर. आर. हस्तेकर यांनी चार आरोपींना दोन वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता नितीन नायक यांनी बाजू मांडून युक्तीवाद केला. तर त्यांना पोहेकॉ कोर्ट पैरवी अधिकारी माधव बेटकर व पोकॉ शिवाजी पतंगे यांनी सहकार्य केले.




