Chandrapur crime :- वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवार, १८ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन (Police stationहद्दीत केली.
चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना पोलिसांनी घेतले ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ब्रम्हपुरी–आरमोरी रोडवरील रेल्वे क्रॉसिंगजवळ सापळा रचण्यात आला. त्यावेळी मोपेडवरून शिकार केलेल्या प्राण्यांची वाहतूक करणारे दोघे इसम पकडण्यात आले. आरोपींची नावे कुंदनसिंग शेरसिंग भुराणी (३१) आणि विजयसिंग सुरतसिंग भुराणी (२१) अशी असून, दोघेही पेठ वार्ड, ब्रम्हपुरी येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून ३ मृत जंगली डुक्कर, एक भरमार बंदूक (Firearms), दारुगोळा आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींवर वन्यप्राणी संरक्षण अधिनियम आणि शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्यांना पुढील कारवाईसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या देखरेखीखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, गणेश भोयर, अजित शेंडे, नितेश महात्मे आणि प्रदीप मडावी यांचा समावेश होता.