परभणी/सोनपेठ (Parbhani) :-पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी तालुक्यातील देवीनगर तांडा येथे गेलेल्या ग्रामसेवकास थापडबुक्क्यांनी मारहाण (Beating) करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार रविवार ४ मे रोजी घडला. या प्रकरणी सोनपेठ पोलिस ठाण्यात सोमवार ५ मे रोजी गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
जागा आताच नावाची करुन देण्याची मागणी.!
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी संदीप आबासाहेब भोसले हे मागील दोन वर्षापासून सोनपेठ पं.स.अंतर्गत मौ. धार डिघोळ येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे देवीनगर तांडा व अव्वलगाव ग्रा.पं.चा अतिरीक्त पदभार देण्यात आला आहे. सध्या भोसले यांच्याकडे प्रधानमंत्री (Prime Minister) अवास योजनेच्या ऑनलाईन सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे.त्या अनुषंगाने संदीप भोसले हे रविवार ४ मे रोजी देवीनगर तांडा येथे सर्वेक्षणाचे काम करत होते. मात्र दुपाारी ३.४५ वाजेच्या सुमारास उत्तम धनाजी राठोड हा तेथे आला. माझ्या मुलाच्या नावे घर का देत नाहीस असे म्हणून ग्रामसेवक संदीप भोसले यांच्याशी वाद घालत होता. सर्वेक्षणाचे काम झाल्यानंतर करुन देते असे संदीप भोसले यांनी सांगितल्या नंतरही उत्तम राठोड याने आताच जागा पाहा आणि लगेच घर नावचे करुन दे म्हणून ग्रामसेवक संदीप भोसले यांची गच्ची पकडली. घाबरलेल्या भोसले यांनी गाडीत बसून निघून जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र उत्तम राठोड याचा पुतण्या विशाल राठोड याने गाडीची चाबी काढून घेतली. गाडीवर लाथा घातल्या. घर नाही दिल्यास तुला दाखवतो असे म्हणून धमकी दिली. हा प्रकार पाहून जमलेल्या ग्रामस्थांनी सोडवा सोडव केली. दुसर्या दिवशी सोमवार ५ मे रोजी ग्रामसेवक संदीप भोसले यांनी सोनपेठ पोलिस ठाणे गाळून तक्रार दिली. त्यावरुन उत्तम राठोड, विशाल राठोड या दोघा विरुध्द विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सोनपेठ पोलिस करीत आहेत.