बांगलादेश हिंदू अत्याचार प्रकरण
परभणी शहरातील शनिवार बाजार ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पर्यत पायी निघणार..!
परभणी (Parbhani Hindu Morcha) : बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ परभणीत सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगळवार १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चा शनिवार बाजार येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत येणार आहे.
सकल हिंदू समाजाच्या वतीने परभणी जिल्ह्यात (Hindu Morcha) हिंदू मोर्चा संदर्भात आवाहन करण्यात येत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर मोर्चासाठी उपस्थित राहण्याचे सांगितले जात आहे. इसवी सन १९४७ पर्यंत बांगलादेश हा भारताचा भाग होता. त्यामुळे तेथील हिंदू हे आपले मूळचे भारतीय आहेत तेव्हा त्यांच्यावर होणारा अत्याचार या निषेधार्थ हा मोर्चा काढला जात आहे. शनिवार बाजार येथून शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळ मार्गे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ येऊन थांबणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले जाणार आहे. मोर्चामध्ये सर्व हिंदू संघटना सहभागी होणार असून सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मोठा पोलीस बंदोबस्त
परभणी शहरांमध्ये हिंदू समाजाच्या वतीने (Hindu Morcha) मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चाची तयारी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. त्या अनुषंगाने कुठे अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त लावला जात आहे. परभणी शहर संवेदनशील असल्यामुळे पोलिसांनाही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.