दाखल झालेल्या गुन्ह्यात १० आरोपींना अटक
इतर आरोपींचा शोध घेण्यास पथके रवाना
हिंगोली (Watakli Beating Case) : सेनगाव तालुक्यातील वटकळी येथे दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणात १६ जूनला रात्रीच्या सुमारास परस्परा विरूध्द दिलेल्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसात १९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, वटकळी येथे दोन गटात १५ जूनला झालेल्या मारहाण प्रकरणात मन्सुरअली बाबु शेख यांनी दिलेल्या तक्रारीत चिकनचे दुकान व पानपट्टी येथे ठेवू नको, या (Watakli Beating Case) कारणावरून त्यांच्यासह साक्षिदारांना खाली पाडून लाथा बुक्याने मारहाण करून टिनपत्राचे दुकान काठ्याने व दगडाने फोडून तसेच त्यांच्या घरामध्ये अनाधिकृतरित्या घुसून कपाट व मोटार सायकल ढकलून देऊन नुकसान केल्याने सेनगाव पोलिसात गणेश रामजी डाखोरे, भारत हनवते, गजानन परसराम अंभोरे, परसराम अंभोरे, विष्णू बाबुराव डाखोरे, वामन कुंडलिक डाखोरे, शुभम शिवाजी हनवते, विश्वनाथ डाखोरे, सोनू लक्ष्मण डाखोरे, नवनाथ गजानन अंभोरे, अमोल गजानन अंभोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच याच प्रकरणात गणेश रामेश्वर डाखोरे यांनी दिलेल्या दुसर्या तक्रारीत मन्सुरअली बाबु शेख यांना तु कोंबड्याचे पाय, नख व आतडे बिरसा मुंडाच्या पाटीजवळ का टाकत आहे, असे विचारल्याच्या कारणावरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून गणेश डाखोरे यांच्यासह साक्षिदारांना जातीवाचक शिवीगाळ करून तुमच्याने काय होते ते करा असे म्हणुन कोंबड्या कापण्याचा चाकू दाखवून (Watakli Beating Case) जीवे मारण्याची धमकी दिल्याने सेनगाव पोलिस ठाण्यात १६ जूनला दिलेल्या फिर्यादीवरून मन्सुर अली बाबु शेख, रुकसाना बाबु शेख, शब्बीर बाबु शेख, आतिफा बाबु शेख, शैलेश बाबु शेख, महेबुब बाबु शेख, सलिम बाबु शेख, टिल्लू बाबु शेख सर्व रा. वटकळी यांच्यावर अॅट्रासिटीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे हे करीत आहेत. या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी आरोपींची शोध मोहीम सुरू केली असता त्यात १० आरोपींना अटक करण्यात आली. इतर आरोपींचा शोध घेण्याकरीता पथके रवाना करण्यात आली आहेत.