नवी दिल्ली (Weather News) : आजपासून संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा तापमानात वाढ झाली आहे. सूर्याची कठोर (Heat stroke) उष्णतेची लाट आणि उष्ण वाऱ्याने सर्वसामान्यांची तारांबळ उडाली आहे. हवामान विभागाच्या (Meteorology Department) माहितीनुसार, आजपासून राजस्थानमध्ये उष्ण वारे (heat waves) वाहू लागतील. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. जैसलमेर जिल्ह्यातून उष्णतेची लाट सुरू होणार असून, पश्चिम राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे.
मानवच नाही तर, पशु-पक्षीही त्रस्त
आज संपूर्ण राज्यात उष्मा जोरात आहे. उष्ण वारे (Heat stroke) माणसांना त्रासून सोडत आहेत. प्रखर सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटेमुळे केवळ मानवच नाही तर, पशु-पक्षीही त्रस्त झाले आहेत. हवामान विभागानुसार आज अनेक ठिकाणी तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकते. राजस्थानमध्ये 10 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
5 दिवसांत तापमानातं 5 अंशांनी वाढ
हवामान विभागाच्या (Meteorology Department) माहितीनुसार, आजपासून राजस्थानमध्ये उष्ण वारे (Heat stroke) वाहू लागतील. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. जैसलमेर जिल्ह्यातून उष्णतेची लाट सुरू होईल. पश्चिम राजस्थानच्या काही भागात (heat waves) उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असेल. येत्या 5 दिवसांत राज्यातील सर्वच ठिकाणचे तापमान 5 अंशांनी वाढू शकते, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. यासोबतच उष्णतेच्या लाटेबाबतही इशारा देण्यात आला आहे.
तीव्र उन्हाळ्यानंतर या राज्यांना दिलासा
हवामान विभागाच्या (Meteorology Department) माहितीनुसार, जोधपूरमध्ये पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा (Heat stroke) इशारा कायम आहे. यानंतर बुधवार 8 मे पासून राज्यातील जैसलमेर, जोधपूर, बिकानेर, अलवर, भरतपूर, ढोलपूर आणि बारमेर या 7 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून येईल. हवामान केंद्र, जयपूरच्या म्हणण्यानुसार, तीव्र उन्हाळ्यानंतर राज्यातील जनतेला 9 मेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. उष्णतेच्या लाटेनंतर 9 आणि 10 मे रोजी राजस्थानच्या जयपूर, उदयपूर आणि भरतपूर विभागात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अखेरीस तापमान 45 अंशांवर पोहोचणार
सध्या हवामान कोरडे (heat waves) राहील. त्याचबरोबर मे महिन्याच्या अखेरीस तापमान 45 अंशांवर पोहोचण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्ये 9 मे रोजी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. कडक उन्हाचा तडाखा (Heat stroke) आणि उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी उन्हात बाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी शाळांमध्ये अद्याप कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत.