जिंतूर तालुक्यातील वस्सा येथील घटना
पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह काढला बाहेर
परभणी (Parbhani Youth died) : जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाणे हद्दीतील वस्सा गावात रविवार ३१ ऑगस्ट रोजी सकाळी घडलेली दुर्घटना संपूर्ण गावाला हादरवून गेली. गावातीलच अभिषेक गजानन राऊत (वय २१) हा आनंदाने विहिरीत पोहण्यासाठी उतरला, पण पोहत असताना अचानक त्याला फिट्स आली. आणि त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील वस्सा येथील तरुण सकाळी साडेसात च्या सुमारास घराजवळ असलेल्या विहिरीत नेहमी प्रमाणे पोहण्यासाठी गेला होता. मात्र पोहत असताना त्याला अचानक फिट्स आली. त्यामुळे त्याचा (Parbhani Youth died) पाण्यात बुडून मृत्यू झाला. विहिरीजवळ असलेल्या काही मुलांनी आरडाओरड केली. मात्र त्याचा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता. घटनेची माहिती मिळताच समजताच ग्रामस्थांनी त्याचा शोध सुरू केला.
गावातील नारायण ताटे, अजय सातव, पिंटू पाटील, राम मगर, दासू राऊत, बंडू राऊत, काशिनाथ राऊत, मुंजाजी शिंदे, गणेश शिंदे अशा अनेक तरुणांनी जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून अथक प्रयत्न केले. दरम्यान, जिंतूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलानेही पथकासह घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतील पाणी मोटारने बाहेर काढून मृतदेह शोधण्याचे प्रयत्न तासंतास सुरू होते.
शेवटी तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. घरातील एक मुलगा गमावल्याने राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. बोरी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून या (Parbhani Youth died) दुःखद प्रसंगाने वस्सा गावात शोककळा पसरली आहे.