सिंदेवाही (Chandrapur) :- पतीसोबत झालेल्या घरगुती वादाचा राग मनात बाळगून पत्नीने रुमालाने गळा आवळून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना आज रविवार १५ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली. मृतक पतीचे नाव दुर्वास चौधरी (३५) असे होते. तर आरोपी पत्नीचे नाव वैशाली दुर्वास बाबूराव चौधरी (३२) असे आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.
झोपेत असतांना रुमालाने गळा आवळून केला खुन
सदर घटनेनंतर मृतक दुर्वासची आई सुनंदा बाबुराव चौधरी यांच्या तोंडी तक्रारी नुसार तिचा मुलगा दुर्वास व सून वैशाली यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. याच रागाच्या भरात वैशाली हिने पती दुर्वासचा झोपेत असतांना रुमालाने गळा आवळून खुन केला. याच तक्रारीवरून गुन्हा नोद करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, उपविभागिय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनात पोनी विजय राठोड पो.स्टे. सिंदेवाही व पथतत्रक करित आहे. सदर गुन्हयात मृतकाची आरोपी पत्नी वैशाली हिला ताब्यात घेण्यात आले असून मृतकाच्या प्रेताचे ग्रामीण रुग्णालय (Hospital) सिंदेवाही येथे शवविच्छेदन (Autopsy) करण्यात आले आहे. पुढिल तपास वरिष्ठाच्या मार्गदर्शनात सिन्देवाही पोलीस करित आहेत