हिंगोली (Hingoli Pola) : हिंगोली शहरात पारंपरिक पद्धतीने शुक्रवारी पोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. तर २३ आँगस्ट शनिवारी पोळ्याच्या कर निमित्त बैलांची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी रामा पहेलवान यांनी मिरवणुकीत दांडपट्टा चालवून उपस्थितांचे लक्ष वेधले होते. तर शहरातील (Hingoli Pola) बैलजोड्यासह बेलवाडी येथील शेतकरी देखील बैलजोड्या घेऊन सहभागी झाले होते. यावेळी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी आनंदात आहेत. २२ आँगस्ट रोजी शहरातील पोळा मारोती भागात पारंपरिक पद्धतीने पोळ्याचा सण साजरा करण्यात आला. यावर्षी मात्र समाधान कारक पाऊस आणि पीक जोमात असल्याने शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने बैल पोळा साजरा केला आहे.
यांत्रिकीकरणा मुळे शेतीमध्ये बैलांचे महत्त्व कमी झाले असले तरी.अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मशागतीसाठी आजही बैलावरच अवलंबून राहावे लागत आहे. उन्हा-तान्हाची पर्वा न करता शेतात राबणाऱ्या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा. हिंगोली शहरात (Hingoli Pola) बैलपोळा साजरा करत शनिवारी पोळ्याच्या करिनिमित बैलांची ढोलताशांच्या गजरात शहरात ठिकठिकाणी बैलाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत रामा पहेलवान यांनी दांडपट्टा चालवून मिरवणुकीत सहभागीचे लक्ष वेधले होते.
यामध्ये महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक यासह मुख्य रस्त्यावर बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी सहभागी होते. तालुक्यातील बेलवाडी येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.अनेक जण फेटे बांधून सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे शेकडो बैल जोड्या ह्या खटकाळी हनुमानाच्या दर्शनाकरता आणल्या होत्या. शहरात दिवसभर (Hingoli Pola) बैलांची मिरवणूक व ढोलताशाचा गजर व फटाक्यांची आतिषबाजी पाहवयास मिळाली शेतकऱ्यांचा मोठा उत्साह दिसुन आला.