अयोध्येला जाताना घडली अपघाताची घटना
हिंगोली/आडगाव रंजे.(Mahakumbh Accident) : वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबूवा येथील जयश्री चव्हाण ह्या प्रयागराजला कुंभमेळयासाठी गेल्या होत्या. तेथील गंगास्नान केल्यानंतर अयोध्येला दर्शनासाठी जात असताना बारबंकी जिल्ह्यातील लोणी कतरा पोलिस ठाणे हद्दितील पुर्वांचल रस्त्यावर नादूरूस्त उभ्या असलेल्या बसवर त्यांची बस आदळून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आडगाव रंजेबूवा येथील जयश्री कुंडलिक चव्हाण (५०) ह्या नांदेड येथील नातेवाईकासोबत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याला टेंम्पो ट्रॅव्हर्लने गेल्या होत्या. त्यांच्या सोबत २३ भाविक रवाना झाले होते. प्रयागराज येथील (Mahakumbh Accident) कुंभमेळ्यात गंगास्नान केल्यानंतर हे सर्व भाविक अयोध्येतील श्री रामचंद्रांच्या दर्शनाकरीता रवाना झाले होते. १६ फेबु्रवारी रविवार रोजी पहाटे ५.३० च्या सुमारास पुर्वांचल एक्सप्रेस वे उभ्या असलेल्या एका ट्रॅव्हल्सवर भाविकांची ही टेंम्पो ट्रॅव्हर्लर जाऊन धडकली.
या भिषण अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबूवा येथील जयश्री कुंडलिकराव चव्हाण (५५) यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील इतर तीन भाविकांचा समावेश आहे. यामध्ये १९ भाविक जखमी झाल्याने त्यांना तात्काळ लखनऊ येथील गोसाई गंज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या (Mahakumbh Accident) अपघाताची माहिती मिळाल्यानंतर लोनकत्रा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचार्यांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असुन त्यातील दोघांची प्रकृति गंभीर आहे. अपघातातील मयत असलेल्या जयश्री चव्हाण यांचा मृतदेह एअर अॅम्बुलंन्सने हैद्राबाद येथे आणला जाणार असुन त्या ठिकाणाहून तिघांचे मृतदेह नांदेड येथे तर जयश्री चव्हाण यांचा मृतदेह आडगाव रंजेबूवा येथे रविवारी रात्रीच्या सुमारास आणला जाणार आहे. जयश्री यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, असा परिवार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या मृत्यूच्या घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
आडगाव रंजेबूवा येथील जयश्री चव्हाण ह्या नांदेड येथील नातेवाईकांसोबत (Mahakumbh Accident) प्रयागराजला कुंभमेळ्याला गेल्या होत्या. तेथील गंगास्नान झाल्यानंतर अयोध्येला जात असताना पुर्वांचल रस्त्यावर अपघाताची घडना घडून त्यांचा मृत्यू झाला.
अखेरचा कुंभमेळा : जयश्री चव्हाण यांचे प्रयागराजला गंगास्नान झाले. तेथून अयोध्येला जात असताना अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्याचा हा अखेरचा कुंभमेळा ठरला.
गावामध्ये शोककळा : जयश्री चव्हाण यांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.