विविध कलमान्वये चौघाविरुद्ध गुन्हा दाखल!
आखाडा बाळापूर (Women Harassment) : लग्नाचे आमीष दाखवून तरूणीवर विविध ठिकाणी जबरदस्तीने अत्याचार करून इतर तिघांनी जातीवाचक व अश्लील शिवीगाळ (Abuse) करीत मारहाण केली. यावरून चौघाविरुद्ध मंगळवारी रात्री उशिरा आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
तरूणीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारिरीक संबंध!
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील एका गावातील 26 वर्षीय तरूणीला 2022 पासून 7 जुन 2025 या कालावधीत रेणकापूर, आनंदनगर नांदेड, औरंगाबाद, रांजनगाव व भाटेगाव येथे शेख आवेस शेख अजगर याने लग्नाचे आमीष दाखवून सोबत राहून वरील कालावधीत वरील ठिकाणी तरूणीच्या (Young Woman) इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारिरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्याने व इतर तिघांनी संगनमत करून जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली, अशी तक्रार सदर तरूणीने आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात (Akhara Balapur Police Station) दिली यावरून शेख आवेस शेख अजगर,शेख परवेज शेख अजगर,शेख समील शेख अजगर व एक महिला सगळे रा. भाटेगाव ता. कळमनुरी विरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल (Filed a Case) करून वसमत पोलीस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, नागोराव बाभळे यांनी घटनास्थळी भेट दिली.