परिसरात चिंतेचे वातावरण
गाडगेबाबा शोध पथकाचे कार्य युद्धपातळीवर सुरू
मानोरा (Youth Death Case) : तालुक्यातील सेवादास नगर येथील युवक मृत्युंजय राजेश राठोड ( वय २३ ) हा दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अरुणावती नदीवर घरगुती गणपती विसर्जनासाठी गेला असता पाय घसरून अरुणावती पात्रात वाहून गेला आहे, मात्र दुसऱ्या दिवशीही (Youth Death Case) त्याचा शोध लागला नसल्याने बचाव पथक युद्धपातळीवर शोध घेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पूर्ण बातमी येथे: सेवादासनगर येथील युवक गेला नदीत वाहून!
मौजे सेवादासनगर येथील अविवाहित युवक राजेश राठोड हा रविवारी दहा वाजता घरगुती विसर्जनासाठी अरूणावती नदीवर गेला होता. नदीपात्रात पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने त्याचा शोध गावातील युवकांनी घेतला असता मिळून आला नाही. यावेळी (Youth Death Case) युवकांनी महसूल व पोलीस प्रशासनाला कळवून माहिती दिली असता, रविवारी सायंकाळी पातूर येथील गाडगेबाबा शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाची टीम २४ तासापासून शोध घेऊनही नदीच्या प्रवाहात वाहून गेलेला युवक वृत्त लिहिस्तोवर न सापडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.