नामांकित कंपन्यात ऑन द स्पॉट मिळणार रोजगार
अमरावती (NCP Sharad Pawar) : बेरोजगारांना चांगल्या कंपन्यांमध्ये रोजगार मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Sharad Pawar) शरदचंद्र पक्षाच्या वतीने भव्य रोजगार मिळायचे आयोजन करण्यात आले असून पहिल्यांदाच नामांकित कंपन्या अमरावतीत येणार आहे. या माध्यमातून ऑन द स्पॉट बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याची माहिती रोजगार मेळाव्याचे मुख्य संयोजक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दिग्गज नेत्यांची राहणार उपस्थिती
महाविद्यालयीन विद्यार्थी, मुले व मुली तसेच ज्यांच्याकडे विविध प्रकारचे कौशल्य आहे अशा 18 वर्षावरील बेरोजगारांना विविध कंपन्यांमध्ये थेट मुलाखती द्वारे रोजगार देण्याची संधी अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Sharad Pawar) शरदचंद्र पवार गटाच्या वतीने पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाचवी ते पदवीधर शैक्षणिक पात्रता असलेल्या बेरोजगारांना त्यांच्या गरजेनुसार विविध कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जवळपास 2000 हजार बेरोजगारांना ऑन द स्पॉट रोजगार देण्यासाठी नामांकित कंपन्यांसोबत संपर्क साधण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता बेरोजगारांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन प्रा. डॉ. हेमंत देशमुख यांनी पत्रकार परिषदेतून केले.
अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar) वतीने शुक्रवार आठ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते तीन या दरम्यान संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे हा भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक व अमरावती विभागातील बेरोजगारांना एक चांगली संधी रोजगाराच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. जवळपास 30 नामांकित कंपन्यासह इतरही काही कंपन्यांनी रोजगार देण्याची तयारी दाखवली आहे.
याकरिता या अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar) वतीने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे. बेरोजगारांना ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुलाखतीला येणाऱ्यांसाठी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन सांस्कृतिक येथे विशेष व्यवस्था करण्यात आली असून त्याच दिवशी नोकरीचे लेटर निवड होणाऱ्यांना दिली जातील. आतापर्यंत 2000 बेरोजगारांनी नोंदणी केली असून आठ तारखेपर्यंत पाच हजार नोंदणी होईल अशी आशा व्यक्त करून हेमंत देशमुख यांनी युवकांनी या संधीचा अधिक लाभ घ्यावा असे आवाहन केले.
दिग्गज नेत्यांची उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीच्या (NCP Sharad Pawar) वतीने आयोजित या मेळाव्याला पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, युवा नेते रोहित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, खा.अमर काळे, रमेशजी बंग यांची या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्या नंतर प्रथमच अमरावती येथे येत असल्याने शशिकांत शिंदे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला गणेश रॉय, सय्यद मन्सूर,अविनाश ठाकरे, निखिल देशमुख, मंगेश भटकर, रोशन कडू, तेजस्वी वर्षाताई भटकर, वर्षाताई गतफणे, विजयराव हावरे, मोबीन माजीद,रावसाहेब वाटणे, विशाल बोरखडे, सतीश चरपे, ॲड .धनंजय तोटे, अमित गावंडे, वहिद खान यांची उपस्थिती होती




 
			 
		

