पवनी (Youth Death) : बकर्यांसाठी चारा आणायला गेलेल्या युवकाचा गोसेधरणाच्या उजव्या कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही (Youth Death) घटना गोसेधरणाच्या उजवा कालवा सिमा गेट कंपनी जवळ गुरूवार दि. २४ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान उघडकीस आली आहे. सत्यपाल निलकंठ सलामे(२६) रा. कोरंभी असे मृतकाचे नाव आहे.
सत्यपाल सलामे हा बकरीपालनासह मजूरीचे काम करीत होता. (Youth Death) सत्यपाल हा बुधवार, दि. २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता दरम्यान बकर्यांसाठी चारा आणायला जातो आहे, असे आईला सांगून बकर्यांसाठी चारा आणण्याकरीता सायकलने घरून निघून गेला. पण सायंकाळचे ४ वाजले तरी सत्यपाल हा घरी परत आला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी त्याची शोधाशोध सुरू केली. पण सत्यपाल कुठेही सापडला नाही. याची तक्रार पोलीस स्टेशन पवनी येथे करण्यात आली.
पोलिसांनी शोधाशोध केली असता दि. २४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान सिमा गेट कंपनी जवळ गोसेधरणाच्या उजव्या कालव्याच्या पाण्यात सत्यपालचे शव (Youth Death) तरंगतांना दिसले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पवनी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हवा. दुर्योधन वकेकार करीत आहेत.




