यशस्वी लोकांच्या अयशस्वी झालेल्या गोष्टी जास्त प्रेरणादायी असतात
अमरावती (Rotary Club Amravati Ambika) : जीवनाच्या वाटेवरून मार्गक्रमण करीत असताना मनुष्य अनेक अडथळ्यांना पार करीत यश संपादन करीत असतो. अशा यशस्वी झालेल्या लोकांच्या अयशस्वी झालेल्या गोष्टी प्रत्येकासाठी जास्त प्रेरणादायी असतात आणि अशा प्रेरणादायी गोष्टींचा प्रत्येकाने आदर्श घेऊन यशाचे शिखर गाठावे असा मोलाचा सल्ला किशोर केडिया यांनी तरुणाईला दिला.
किशोर केडिया यांनी तरुणाईला दिला यशस्वी जीवनाचा मंत्र
सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य अशा रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाच्या (Rotary Club Amravati Ambika) वतीने वलगावस्थित सिकची रिसॉर्ट येथे दोन दिवसीय रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाचे अध्यक्ष अमोल चवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उद्घाटन समारंभाला विशेष अतिथी म्हणून डीजीएन किशोर राठी नागपुर यांची उपस्थिती होती तर रोटरीचे सचिव प्रा. डॉ. लोभस घडेकर, डॉ. पूजा कोल्हे, प्रकल्प समन्वयक दिलीप कौसकीया, सीकची चॅरिटेबल ट्रस्ट्र चे सचिन माळकर ,शशांक विश्वरूपे ,आनंद दशपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
जागतिक स्पर्धेच्या युगात नवयुवकांसमोर करिअरच्या नव्या वाटा निर्माण झाल्या आहेत. त्याचा सामना करताना आलेल्या यश-अपयशाने खचून न जाता त्यांचे मनोबल वाढविणे तसेच त्यांना योग्य दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून आयोजित दोन दिवसीय करियर मार्गदर्शन शिबिरात विविध विषयात नावलौकिक मिळवलेल्या विषय तज्ञांनी युवकांना मार्गदर्शन केले. यामध्ये ‘करिअर गायडन्स’ यावर अमित राठी (नाशिक), ‘ध्यानयोग’ शिवाजी कुचे (अमरावती), ‘कॉर्पोरेट जगासाठी तयारी’ या विषयावर स्नेहा टावरी (नागपुर), ‘मोबाईलचे व्यसन’ डॉ मोनालि ढोले (अमरावती), पायलट टेनर दिलीप कोसकिया मी आणि माझे पालक व टाईम लाईन मॅनेजमेन्ट ‘युवापीढ़ी डॉ. सायसिकमल, ‘सनातन धर्मात पालकांची जवाबदारी’ अनिल राठी, ‘उद्योजकता’ अतुल कोल्हे, ‘बिग बॉस गेम’ रवि टांक, ‘मुलींच्या शरीरातील बदल’ डॉ. मोनाली कादंबे, ‘या रिदम गेम’ या विषयावर हार्दिक कक्कड ,गौरव वानखडे तसेच निलेश खंडेलवाल यांनी बँकिंग जगताचे फायदा व जोखीम याची माहिती खेळीमेळीच्या वातावरणातून करून दिली यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोटरी युथ लीडरशिप अवॉर्डचे वितरणही करण्यात आले. प्रथम पारितोषिक अशोक बोबडे, अंशुलिका नागरिया, द्वितीय दृष्टि शर्मा, श्रुती पांडव तर तृतीय पारितोषिक जयेश झांबानी, देवश्री काळबांडे यांनी पटकाविले. या कार्यक्रमाला रोटरीचे प्रवीण बोड़खे, अखिलेश खेतान, डॉपंकज मोरे, डॉ शशिकांत थोरात, प्रवीण परिमल, रामभैया छुटलानी, संकेत मोहता, गौरव वानखड़े, स्वप्निल करवा, पायल करवा, संजय बोरोडे, डॉ.दिपक डागा, ज्योती डागा, दिनेश सराओगी, डॉ.अंकुश मानकर, अमित तिडके, सरोज तीडके, अमित हिंडोचा, गीता हिंडोचा, कृति टांक, श्वेता खेतान , निलेश खंडेलवाल, शीतल खंडेलवाल, अक्षय पेटे, युंगधरा गुल्हाने, विजय गुल्हाने यांची उपस्थिती होती.