Yawatmal :- एका २७ वर्षीय तरूणाची जुन्या वादातून हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना शहरातील जांब मार्गावर मंगळवारला सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली असून मारेकर्याला अवधुतवाडी डिबी पथकाने तातडीने ताब्यात घेतले.
नवरात्री उत्सवाच्या दुसर्याच दिवशी घडली घटना
गौरव विलास बावने वय २७ वर्ष रा. एसटी कॉलनी, जांबरोड, यवतमाळ असे मृतकाचे नाव असून स्वप्नील दत्तात्रय सुलभेवार वय ३७ वर्ष रा. मणीयार ले-आऊट, यवतमाळ असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मारेकर्याचे नाव आहे. शहरातील जांब रोडवर विलास बावने यांनी पान टपरी असून त्यांनी त्याच्या टपरी बाजूला अग्रवाल नामक व्यक्तीला पैश्याची मदत करून एक दुसरी पान टपरी बनवून दिली होती. सुमारे आठ महिन्यापूर्वी ती टपरी अग्रवाल याने स्वप्नील सुलभेवार याला चालवायला दिली होती. तीच टपरी स्वप्नील याने एका चहा टपरी वाल्याला भाड्याने दिली होती. त्याचे भाडे स्वप्नील घेत असल्याने गौरव आणि स्वप्नील यांच्यात वाद सुरू होता. अश्यात सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास बावने कुटूंबीय घरी असतांना गौरव याने कुटूंबीयांना सांगितले की, रविवारी रात्री तो आणि अभय डोंगरे, राहुल मेश्राम व प्रज्वल मेंढे आदीसह जांब मार्गावर थांबला होता. त्यावेळी आदीत्य चव्हाण हा पान टपरीच्या मागे सिगारेट (cigarettes)पिण्यासाठी जात होता.
आरोपीला अटक; जांब मार्गावरील धक्कादायक घटना
यावेळी गौरव याने तू या ठिकाणी सिगारेट पीत जावू नको, असे बोलल्याने त्यांच्या थोडा वाद झाला होता. दरम्यान सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास विलास बावने आणि त्यांचा मुलगा गौरव जांब मार्गावर उभे असतांना त्यांनी आदित्या याला गौरव आणि तु आपसात वाद करू नका असे सांगितले. अश्यात स्वप्नील त्या ठिकाणी आला आणि बावने यांना शिविगाळ करू लागला. तसेच गौरव याच्यावर चाकु हल्ला केला. डॉक्टरांनी तपासणीदरम्यान त्याला मृत घोषीत केले. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मारेकरी स्वप्नील सुलभेवार याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले. गुन्हा दाखल होताच एलसीबीचे एपीआय पवन राठोड,एपीआय श्रीकांत जिद्दमवार, मिथुन जाधव, विशाल भगत, मो भगतवाले, कमलेश भोयर यांनी आरोपीला अटक केली.