पवनी पोलिसात गुन्हा दाखल
भंडारा (Police Accident) : गौ तस्करी करणार्या वाहनाला थांबविण्याच्या प्रयत्नात जनावरांची तस्करी करणार्या वाहन चालकाने कारवाई टाळण्यासाठी पळाला. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन वाहन पकडण्याचा प्रयत्न नागभिड पोलिसांनी केला. (Police Accident) मात्र गौ तस्करांनी पाठलाग करणार्या पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि.१३ जून रोजी सायंकाळी पवनी तालुक्यातील निष्ठी फाटा येथे घडली.
नागभिड ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गोविंदलवार हे दि.१३ जून रोजी आपल्या सहकारी कर्मचार्यांसह पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्तीदरम्यान पहाटे चार वाजता दरम्यान जनावरांची तस्करी करणार्या वाहनाला थांबविण्याचा ईशारा केला. मात्र (Police Accident) वाहनचालकाने वाहन न थांबविता पळून गेला. पोलिसांनी वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करीत निलज फाटा येथे वॅग्नार कार क्र.एमएच ४९ बीआर १२६७ यामधील तस्करांनी पोलिसांच्या वाहनासमोर आपले वाहन आणून गौ तस्करी करणारे वाहन क्र. एमएच ३६ एए ४०५४ या वाहनाचा पाठलाग करण्यास अडथळा निर्माण करीत होते. यादरम्यान बोलेरो वाहन पवनीच्या दिशेने सुसाट पळाला.
पोलिसांनी गौ तस्करी करणार्या वाहनाचा पाठलाग केला तेव्हा निष्ठी फाट्यावर वॅग्नार कारने पुन्हा पोलीस वाहनाला अडथळा आणून गौ तस्करी करणार्या बोलेरो वाहन चालकाने (Police Accident) पोलिसांच्या वाहनाला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न केला. यात पोलीस जखमी झाले. तर बेभान जाणारे बोलेरो वाहन उलटले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता बोलेरो वाहनात १४ जनावरांची कत्तलीकरीता वाहतूक करतांना आढळून आले. तक्रारीवरुन पवनी पोलिसात विनोद मदनकर रा.पवनी, यश रामटेके रा.निष्ठी, दिवाकर कुंभारे रा.तोरणा, ता.ब्रम्हपुरी, प्रदीप भुरे रा.पवनी, तसेच वॅग्नार कार चालक विरुद्ध गुन्हा दाखल करुन अपघातग्रस्त बोलेरो वाहन जप्त करण्यात आले आहे.