हिंगोली (Election Commission) : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानूसार मतदार यादीचा विशेष संक्षिप्त – पुनरिक्षण कार्यक्रम पार पडला. ३० ऑगस्टला प्रसिध्द अंतिम मतदार यादीत जिल्ह्यातील मतदार संख्या ९ लाख ७५ हजार ५४१ असुन या यादीत १७५४२ मतदार संख्या वाढल्याची माहिती नूतन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
३० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अभिनव गोयल, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी बोलताना सांगितले की, १ जुलै २०२४ या अहर्तावर मतदार यादीत ९ लाख ५६ हजार ९९९ मतदार संख्या होती. (Election Commission) मतदार पुनरिक्षण कार्यक्रमात १७ हजार ५४२ मतदार संख्येत वाढ झाली. ज्यामध्ये मतदार संघ निहाय वसमत ५७८६, कळमनुरी ६४०४ तर हिंगोली ५३२२ मतदार वाढले आहेत. तसेच दिव्यांगाची मतदार संख्या ५९६० झाली आहे. ज्यामध्ये मतदार संघ निहाय वसमत २२८९, कळमनुरी २१७८. हिंगोली १४९३ अशी मतदार संख्या झाली आहे. यावेळी १४८ दिव्यांग मतदार वाढले आहेत.
३० ऑगस्ट रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीत १ लाख ७४ हजार ५४१ मतदार संख्या झाली आहे. ज्यामध्ये मतदार संघ निहाय वसमत ३ लाख १७ हजार ४९१, कळमनुरी ३ लाख २६ हजार ६८६, हिंगोली ३ लाख ३० हजार ३६४ मतदार आहेत. हिंगोली जिल्ह्यात १०१५ मतदार केंद्र आहेत. ज्यामध्ये मतदार संघ निहाय वसमत ३२७. कळमनुरी ३४५ व हिंगोली ३४३ मतदार आहेत.
त्याच प्रमाणे १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत (Election Commission) मतदार यांद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमात एकुण ३७८५ मतदारांची वगळणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये मतदार संघ निहाय वसमत मतदार संघात मयत ४५१, स्थलांतरीत ४१४. दुबार ७६ एकुण १४१. कळमनुरी मतदार संघात मयत ७८२, स्थलांतरीत ४६२, दुबार १३२ एकुण १३७६, हिंगोली मतदार संघात मयत ८०६, स्थलांतरीत ५१८. दुबार १४४ एकुण १४६८ असे तिनही मतदार संघात एकुण मयत २०३९, स्थलांतरीत १३९४ दुबार ३५२ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. आणखी सुध्दा ज्या मतदारांची नावे मतदार यादीत नाही, अशांची नावे (Election Commission) निवडणूक कार्यक्रमाच्या २० दिवसापूर्वी पुरवणी यादीत घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गोयल यांनी दिली.