वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा!
परभणी (Rasta Roko Aandolan) : परभणी तालुक्यातील धर्मापुरी येथील ग्रामीण महामार्ग (५४) धर्मापुरी ते कौडगाव या रस्त्याचे काम जिल्हा नियोजन समिती यादीमध्ये असून सदरील काम हे ४० लक्ष रुपयांचे होते. मात्र सदरील काम ग्रामीण महामार्ग ५४ या ठिकाणी झालेलेच नसून संबंधित कंत्राटदाराने सदरील पैसे दोन वर्षांपूर्वीच उचलले असल्याने संबंधित दोषी कंत्राटदारांवर कारवाई करून रस्ता करून देण्याच्या मागणीकरिता धर्मापुरी येथील सरपंच, उपसरपंच सहित गावकऱ्यांनी सोमवार २५ रोजी ९.३० च्या दरम्यान रास्ता रोको आंदोलन चालू केले होते. तब्बल दीड तास आंदोलन केल्यानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्या होत्या यावेळी तात्काळ जि.प सीईओ नितिषा माथुर यांनी दूरध्वनीद्वारे सरपंच,उपसरपंच यांना संबंधितांवर कारवाई करून इस्टिमेट प्रमाणे रस्ता करून देण्याची संमती दर्शवल्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
सीईओंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!
परभणीतील धर्मापुरी ग्रामपंचायतीने वेळोवेळी जिल्हाधिकारी, सीईओ यांच्याकडे वेळोवेळी सदरील रस्त्या प्रकरणाची लेखी तक्रार केली. त्यानंतर संबंधित जिल्हा परिषद अभियंता, कंत्राटदार, यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर सदरील रस्ता इस्टिमेट प्रमाणे करून द्या असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असूनही याकडे संबंधित कंत्राटदाराने (Contractor) दुर्लक्ष केले.. मात्र काही दिवसांपासून सदरील काम कंत्राटदारामार्फत थातुर – मातुर करण्याचा प्रयत्न होत होता. मात्र हे काम थांबवून या रस्त्या कामाची चौकशी करून इस्टिमेट प्रमाणे काम करून देण्याची मागणी धर्मापुरीचे सरपंच तानाजी कदम यांनी केली होती. त्या संदर्भात सोमवार २५ ऑगस्ट रोजी धर्मापुरी येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन गावकऱ्या मार्फत करण्यात आले होते. तब्बल दीड तासानंतर सीईओ नितीशा माथुर यांनी संबंधित कंत्राट दरांवर कारवाई करून रस्ता करून देण्याची संमती दर्शविल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले यावेळी धर्मापुरी येथील गावकऱ्यांसह (Villagers) ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सीईओंचे आश्वासन अन.. आंदोलन मागे..
रस्ता कामाचा (Road Works) चौकशी करिता धर्मापुरी येथील गावकऱ्यांनी धर्मापुरी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते. या ठिकाणी जिल्हा परिषदचे अभियंता सोनकांबळे दाखल झाले होते, मात्र आम्हाला सीईओकडून आश्वासन हवे अशी मागणी गावकऱ्यांनी केल्यानंतर तब्बल दीड तास आंदोलन चालू असल्याने जि प सीईओ नीतिशा माथुर यांनी दूरध्वनी द्वारे रस्ता कामाची चौकशी करून रस्ता करून देण्याची संमती सरपंच ,उपसरपंच यांना दर्शविल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
दीड तास रास्ता रोको; वाहनांच्या लांबच लांब रांगा!
धर्मापुरी गावकऱ्यांनी धर्मापुरी फाट्यावर पहाटे ९.३० वाजता रास्ता रोको आंदोलन चालू केल्यानंतर आंदोलन तब्बल दीड तास चालले. त्यामुळे धर्मापुरी पासून टाकळी पर्यंत तसेच धर्मापुरी पासून परभणीच्या दिशेनेही वाहनाच्या लांबच लांब अशा रांगा लागल्या होत्या.