सिरोंचा पोलिसांची कारवाई ,२०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त
सिरोंचा (Animals Slaughter) : ट्रकमधून जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती मिळताच सिरोंचा पोलिसांनी सापळा रचून ३४ जनावरांची सुटका केली. या प्रकरणात २०.४० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज २ जून रोजी करण्यात आली.
ट्रकमधून अवैधरित्या जनावरे कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती सिरोंचा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचला.अशोक लेलँड कंपनीचा ट्रक एमएच ३४ बिझेड ४८७१ हा येतांना दिसल्यानंतर त्याला थांबविण्याचा ईशारा देण्यात आला. मात्र ट्रकचालकाने ट्रक समोर दामटला. यामुळे पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून ट्रकला अटकाव केला. याप्रकरणी ट्रकचालक रमेश बक्काना पोरला(३५ ) रा. असिफाबाद याला ताब्यात घेऊन कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याकडे (Animals Slaughter) जनावरांची वाहतुक करण्याची कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत.
पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये ३४ जनावरे (Animals Slaughter) कोंबुन बांधली असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ३ लाख ४० हजार रूपये किमतीची जनावरे तसेच १७ लाख रूपये किमतीचा ट्रक असा २० लाख ४० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.ही जनावरे नांदगांव येथून हैद्राबादकडे नेली जात होती असे ट्रकचालकाने सांगितले. या प्रकरणी ईतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.
जप्त करण्यात आलेले ३४ गोवंशीय जनावरे (Animals Slaughter) चंद्रपूर येथील गोशाळेत हलवण्यात आले असून, तेथे त्यांच्या चार्यापाण्याची व औषधोपचाराची योग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मारुती धरणे, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रांजली कुलकर्णी, पोलीस उईके,दागम, मस्के, काकडे, नागूला यांनी सक्रिय सहभाग घेतला.