Parbhani :- एक हात मदतीचा, शेतकर्यांनी शेतकर्याला केलेली एक अनोखी मदत या उपक्रमाअंतर्गत भाजीपाला उत्पादक (Vegetable producer) ग्रुपच्या वतीने एका गरजू शेतकरी महिलेला ४० हजार २०० रुपयांची वर्गणी जमा करून आधार दिला.
परभणीतील धानोरा काळे येथील महिलेस ४० हजार २०० रुपयांची मदत..!
यावर्षीच्या दिवाळीपासून शेतकर्याला एक आधारस्तंभ किंवा गरजूवंत शेतकर्याला काहीतरी मदत व्हावी ही मनात असलेली तळमळ ह्या हेतूने भाजीपाला उत्पादक ग्रुपने यावेळेस पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील एका गरजू शेतकरी महिलेला ४० हजार २०० रुपयाची ग्रुपच्या माध्यमातून वर्गणी जमा करून दिलेली आहे. ही वर्गणी नसून एक शेतकर्याला दिलेला आधार आहे. किंवा बहिणीला दिलेली दिवाळीची भेट आहे. शेतकरी(Farmers) ताईकडे फक्त एक एकर जमीन आहे. ती पण झालेल्या अतिवृष्टी पाण्यामुळे पूर्ण पाण्याखाली गेलेली होती. खूप बिकट परिस्थिती असून या ताईचे घर पत्र्याचे आहे. ते सुद्धा शेतामध्येच आहे. ग्रुप हा गेल्या सात ते आठ वर्षापासून सक्रिय आहे. ग्रुपच्या माध्यमातून खूप कार्यक्रम दरवर्षी राबवली जातात. पण समाजाचं देणं म्हणून कुठेतरी समाजाला एक मदत करावी ह्या हेतूने आजचा उपक्रम भाजीपाला उत्पादक हा ग्रुपच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे.
भाजीपाला उत्पादक गु्रुपचा उपक्रम
या ग्रुपचे सक्रिय सभासद डॉ. दिगंबर पटाईत, अनिल वडजे, रामेश्वर साबळे, प्रकाश हरकळ, विजय जंगले, पंडित थोरात, विद्याधर संघई, तुळशीराम दळवी, प्रा. सावंत, ज्ञानेंद्र फुलझडके, जनार्धन आवरगंड यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून परभणी जिल्ह्याचे जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव तसेच न्यायाधीश भूषण काळे, चंद्रकांत देशमुख, गजानन गडदे, प्रताप काळे, माणिकराव खिल्लारे ,भगवानराव गिराम यांच्या हस्ते हा निधी शेतकरी महिलेस देण्यात आला.