झुंजार स्वातंत्र्य सेनानी माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर यांच्या जन्मशताब्दीपूर्ती निमित्त हिंगोलीत सोहळ्याचे आयोजन
हिंगोली (Sharad Pawar) : झुंजार स्वातंत्र्य सेनानी माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर यांच्या जन्मशताब्दीपूर्ती निमित्त ‘आजन्म सेनानी’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन 27 जानेवारी रोजी माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ग्रंथाचे संपादक संजय टाकळगव्हाणकर यांनी दिली.
माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर यांच्या जन्मशताब्दी पूर्ती निमित्त त्यांचा भव्य सत्कार समारंभ व शांती हॉटेलचे उद्घाटन कार्यक्रमास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी पक्षाचे( शरदचंद्र पवार पक्षाचे) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, प्रमुख उपस्थिती सार्वजनिक आरोग्य व बांधकाम राज्यमंत्री मेघनाताई (साकोरे) बोर्डीकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील माजी मंत्री राजेश टोपे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संतोष बांगर आमदार प्रज्ञाताई सातव आमदार श्वेता ताई महाले आमदार राजू नवघरे विधान परिषदेचे सदस्य हेमंत पाटील आमदार सतीश चव्हाण आमदार किरण सरनाईक आमदार विक्रम काळे आमदार सुभाष वानखेडे माजी खासदार शिवाजी माने माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर माजी आमदार सुरेश देशमुख माजी आमदार संतोष टार्फे माजी आमदार गजानन घुगे माजी आमदार विजयराव भांबळे माजी आमदार रामराव वडकुते माजी आमदार मोहनराव हंबर्डे माजी आमदार पंडितराव देशमुख माजी आमदार बळीराम पाटील कोटकर माझी शिक्षण सभापती रूपाली पाटील गोरेगावकर माजी नगर अध्यक्ष बाबाराव बांगर, महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स मुंबई चे अध्यक्ष वसंतराव घुई खेडकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील उपस्थित राहणार आहेत.
याच कार्यक्रमांमध्ये शरद चंद्र पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा समाजसुधारक माणिकराव टाकळगव्हाणकर यांच्या जीवन संघर्षावर संजय टाकळगव्हाणकर यांनी संपादित केलेले. गौरव ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. या ग्रंथामध्ये माणिकराव टाकळगव्हाणकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये जो सशस्त्र लढा दिला त्यामध्ये त्यांनी त्या काळामध्ये नागपूर येथील बर्डी येथे लष्करी तीन महिन्याच्या प्रशिक्षण घेतले होते त्यानंतर त्यांनी शेंबाळपिंपरी कॅम्पचे प्रमुख दिपाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निजामाची वाहतूक व्यवस्था विस्कळीत करण्यासाठी दिनांक 15 ऑक्टोंबर 1947 रोजी नांदापूर नजीक रेल्वे रूळ उखडून रेल्वे पाडली. याशिवाय भाटेगाव येथील अत्याचारी रोहिल्यांचे मुंडके छाटले.
हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्या आजेगाव रणसंग्रामामध्ये ते सहभागी होते. जंगल सत्याग्रह याशिवाय निजाम स्टेट विरुद्ध भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईमध्ये ते वाटाडे होते. सशस्त्र लढायच्या या अनेक मोहिमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता त्यांच्यासोबत विठ्ठलराव नाईक, गंगाप्रसाद अग्रवाल, बापूराव शिंदे, नानाराव दळवी अण्णाराव टाकळगव्हाणकर, प्रतापराव किल्ले वडगावकर, रावसाहेब किल्ले वडगावकर इत्यादी स्वातंत्र्य सैनिक होते. या स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी या ग्रंथामध्ये असून या ग्रंथामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या अनेक सामाजिक चळवळीमध्ये ते सहभागी होते. डॉक्टर पंजाबराव देशमुख, बाबासाहेब सवनेकर, शिवाजीराव देशमुख यांच्याबरोबर हो कार्य केलेले आहे.
या गौरव ग्रंथांमध्ये सुप्रसिद्ध कवी फ मु शिंदे यांची कवितासह ज्येष्ठ साहित्यिक जगदीश कदम व शिक्षण क्षेत्रातील प्राचार्य प्राध्यापक कृषी क्षेत्रातील मान्यवरांचे लेख व प्रतिक्रिया गौरव ग्रंथामध्ये माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर यांच्या एकंदरीत स्वातंत्र्यलढा सामाजिक व शेती विषयी लेख आहेत . हा गौरव ग्रंथ साकारण्यामध्ये दिलीप चव्हाण, नरेश देशमुख यांच्या पुढाकाराने. गौरव ग्रंथाचे संपादक संजय टाकळगव्हाणकर सहाय्यक संपादक विठ्ठल सोळंके, गंगाप्रसाद भिसे, खंडेराव सरनाईक, संजय नाईक, राजाराम पाटील यांनी विशेष परिश्रम घेऊन सदर गौरव ग्रंथ साकारला आहे. या गौरव ग्रंथाची मांडणी, सजावट व मुखपृष्ठ सृजन कम्युनिकेशन च्या संचालिका सायली नयन बाराहाते व किशोर आटकोरे यांनी केले तर नयन प्रकाशक मुंबई यांनी या ग्रंथाचे प्रकाशन केले.