गर्भवती महिलेला हूंदके देत शोधावी लागली पायवाट
सुधिर गोमासे
तुमसर (Tumsar Ambulance) : तालुक्यातील तामसवाडी (सितेपार) या गावातील एका गर्भवतीस प्रसूती कळा सुरू झाल्यास तिला रूग्णालयात नेण्यासाठी रूग्णवाहिका आली. मात्र रूग्णालयाकडे जाणार्या गावातील चिखलमय रस्त्यात (Tumsar Ambulance) रूग्णवाहिका अडकली. अशाच प्रसूतीकळाच्या वेदनेने विव्हळत या गर्भवतीने होणार्या बाळासह हुंदके देत चक्क चिखलातून पाय वाट काढली.
नऊ महिन्याची गर्भवती असलेल्या एका गर्भवती महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. तिला (Tumsar Ambulance) रूग्णालयात दाखल करण्याकरिता रूग्णवाहिका बोलावण्यात आली. काही वेळातच रूग्णवाहिका गावात पोहोचली. मात्र, ऐन पावसाळ्यात गावात करण्यात आलेल्या रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे रस्त्यावर निर्माण झालेल्या चिखलात रूग्णवाहिका फसली. यामुळे गरोदर महिलेला चिखलातूनच पायी वाट काढत जावे लागले. ही घटना तुमसर तालुक्यातील तामसवाडी (सितेपार) या गावात घडली. आदिवासी वस्ती पाड्यांवर रस्त्याअभावी रूग्णांचे हाल होत असल्याचे चित्र नेहमीच पाहण्यास मिळत असते.
मात्र, हे जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील तामसवाडी या गावातील पवन तिवाडे यांच्या पत्नीला प्रसूतीकळा जाणवू लागल्या होत्या. यामुळे लगेच रूग्णवाहिका बोलावण्यात आली. काही वेळातच रूग्णवाहिका गावात दाखल झाली. यानंतर महिलेला रूग्णालयात नेण्यासाठी रूग्णवाहिका आली. मात्र,पावसाळ्याच्या दिवसात गावातील अपूर्ण राहिलेल्या रस्त्याच्या कामामुळे सर्वत्र चिखल झालेला आहे. या चिखलात रूग्णवाहिकेचे चाक फसले. यामुळे चिखलात फसलेल्या रूग्णवाहिकेला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी धक्का मारून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपयोग झाला नाही.
ग्रामस्थांकडून तीव्र संताप
रुग्णवाहिका (Tumsar Ambulance) चिखलात फसून असल्याने महिलेला चिखलातून कशीबशी पायी वाट काढावी लागली. चिखलातून रुग्णवाहिका न निघाल्याने शेवटी रुग्णवाहिका गावातील ट्रॅक्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर करण्यात आलेल्या अर्धवट कामामुळे गर्भवती महिलेला चिखलातून वाट काढावी लागल्याने ग्रामस्थांमध्ये संताप बघायला मिळाला.




