Pusad :- जुन महिन्यात भाजपतर्फे मुख्याधिकारी यांना थेट शहरातील विविध रस्ते, गल्ल्यामध्ये फिरवून त्यांना अस्वच्छतेचे दर्शन करविले होते. त्यावेळी मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी अस्वच्छताची समस्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन दिले होते. तर अतिक्रमण काढून टाकण्यासाठी सर्व अतिक्रमण धारकांना ८ दिवसाचा अल्टीमेटम दिला होता.
सर्व अतिक्रमण धारकांना ८ दिवसाचा अल्टीमेटम
मात्र ८ नव्हे तर १५ दिवस उलटूनही त्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने भाजपतर्फे १४ जुलै रोजी आमरण उपोषणाचे हत्यार (weapon) उपासण्यात आले. उपोषण सुरु होताच अवघ्या ६ तासात मुख्याधिकारी यांनी अतिक्रमण (Encroachment) हटविण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्तचा २ लाख ८९ हजार ८९० रु.चा धनादेश पोस्टेमध्ये जमा केला. तसेच ४ ते ८ ऑगस्ट पर्यंत अतिक्रमण मोहीम राबविण्यात येईल, असे लेखी दिल्यानंतर उपोषणमागे घेण्यात आले. आता ४ ऑगस्ट जवळ येत असल्याने न.प. तर्फे रहदारीला अडथळा ठरणार्या सर्व अतिक्रमण धारकांना ३ ऑगस्टपर्यंत अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले असून त्यानंतर राबविल्या जाणार्या मोहीममध्ये नुकसान झाल्यास अतिक्रमण धारक स्वतः जबाबदार राहतील, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वांचे ४ ऑगस्ट कडे लक्ष लावले आहे.