Constitution March

खर्गे यांच्या अवमानाविरोधात आणि राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ आज लातूरमध्ये संविधान मार्च

लातूरमध्ये राहुल गांधींवरील कारवाई आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या अवमानाच्या निषेधार्थ काँग्रेस, महाविकास आघाडी व पुरोगामी संघटनांकडून आज संविधान मार्च.

खर्गे यांच्या अवमानाविरोधात आणि राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ आज लातूरमध्ये संविधान मार्च

महाविकास आघाडी, पुरोगामी संघटनांचा आज संविधान मार्च!

लातूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीतून दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या जाहीर सभेनंतर करण्यात आलेल्या जातीयवादी कृत्याविरोधात आज, सोमवारी (दि. ७) सकाळी ११ वाजता लातूर शहरात काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने भव्य ‘संविधान मार्च’ काढून तीव्र निषेध आंदोलन छेडण्यात येणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके आणि शहर जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांनी ही माहिती दिली.

उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे खर्गे यांच्या जाहीर सभेनंतर भाजप आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी त्या जागेचे तथाकथित "शुद्धीकरण" करण्याचे विकृत कृत्य घडवून आणले. एका ज्येष्ठ दलित नेत्याच्या कार्यक्रमानंतर असे शुद्धीकरण करणे हे मानवीय दृष्टिकोनातून अत्यंत अशोभनीय, हीन आणि संविधानाची पायमल्ली करणारे आहे.

या उघड जातीयवादी आणि मनुवादी प्रवृत्तीचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत परखड शब्दांत समाचार घेत दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु, जातीय सलोखा बिघडवणाऱ्या त्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याऐवजी उत्तराखंडमधील भाजप सरकारच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या पोलिसांनी उलटा न्याय करत थेट राहुल गांधी यांच्यावरच हल्द्वानी येथील शहर कोतवाली पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला.

या सरकारी सूडबुद्धीचा आणि जातीयवादी मानसिकतेचा तीव्र निषेध करण्यासाठी आज लातूर शहरात ‘संविधान मार्च’चे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा आज सकाळी ठीक ११:०० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू होईल आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी चौकात येऊन या मोर्चाचे रूपांतर भव्य निषेध सभेत होईल.

या आंदोलनात काँग्रेस पक्षासोबतच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी, लातूर जिल्ह्यातील सर्व समविचारी व पुरोगामी सामाजिक संघटना, आंबेडकरी व लोकशाहीवादी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, काँग्रेसचे सर्व लोकप्रतिनिधी, फ्रंटल ऑर्गनायझेशन, विविध सेलचे प्रमुख, युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल, महिला काँग्रेसचे कार्यकर्ते, पुरोगामी संघटनांचे प्रतिनिधी आणि समस्त संविधानप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संविधान मार्चमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अभय साळुंके आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

Congress MP Varsha Gaikwad: नाशिकहून शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपल्या मागण्यांसाठी मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरून काँग्रेस खासदार प्रा. वर्षा गायकवाड..

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026