Hunger Strike

२९ ऑगस्ट पुन्हा आंदोलनाचा दिवस; आंतरवाली सराटीत जरांगेंचे आमरण उपोषण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची धार तीव्र केली आहे.

२९ ऑगस्ट पुन्हा आंदोलनाचा दिवस; आंतरवाली सराटीत जरांगेंचे आमरण उपोषण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

२९ ऑगस्ट २०२३ पासून आतापर्यंत अनेकदा उपोषण; आंतरवाली सराटीपासून मुंबईच्या आझाद मैदानापर्यंतचा आंदोलनांचा प्रवास

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची धार तीव्र केली आहे. २९ ऑगस्ट २०२६ पासून आंतरवाली सराटी येथे त्यांनी ११व्या आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सरकारला इशारा देत विविध मागण्या मांडल्या. तसेच मराठा समाजाला आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना घराबाहेर पडण्याचे आवाहन करत समाजाची ताकद दाखवण्याची गरज व्यक्त केली. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजातील अनेक कार्यकर्ते आणि नागरिक आंतरवाली सराटीकडे रवाना होत आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडूनही परिसरातील बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट २०२३ ते आतापर्यंत एकूण १० उपोषण केली आहेत. त्यापैकी आठ उपोषण आंतरवाली सराटी येथे, तर दोन उपोषण मुंबईत झाली आहेत. आता त्यांनी पुन्हा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या आंदोलनांचा हा प्रवास पाहूया.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणांचा क्रम

पहिले उपोषण : १७ दिवस

कालावधी : २९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३
ठिकाण : आंतरवाली सराटी, जालना

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी पहिले उपोषण आंतरवाली सराटी येथे केले. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आंतरवाली सराटी येथे पोहोचले. जरांगे यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले.

दुसरे उपोषण : ९ दिवस

कालावधी : २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२३
ठिकाण : आंतरवाली सराटी

या आंदोलनादरम्यान न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड (निवृत्त), न्यायमूर्ती सुनील शुक्रे (निवृत्त), जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाल आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, उदय सामंत आणि अतुल सावे यांनीही भेट घेऊन सरकारची भूमिका त्यांच्यासमोर मांडली.

तिसरे उपोषण : १ दिवस

कालावधी : २६ ते २७ जानेवारी २०२४
ठिकाण : नवी मुंबई

या उपोषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'सगेसोयरे' संदर्भातील मसुदा अधिसूचना जाहीर केली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले.

चौथे उपोषण : १७ दिवस

कालावधी : १० ते २६ फेब्रुवारी २०२४
ठिकाण : आंतरवाली सराटी

जरांगे पाटील यांचे हे आतापर्यंतचे सर्वात दीर्घ उपोषण ठरले. महाराष्ट्र विधानसभेने मराठा आरक्षणाचे १० टक्के विधेयक मंजूर केल्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित केले.

पाचवे उपोषण : ६ दिवस

कालावधी : ८ ते १३ जून २०२४
ठिकाण : आंतरवाली सराटी

या वेळी राज्य सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्री शंभूराज देसाई आणि औरंगाबादचे खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि मागण्यांसाठी वेळ देण्याची विनंती केली. त्याआधी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही त्यांची भेट घेतली होती.

सहावे उपोषण : ५ दिवस

कालावधी : २० ते २४ जुलै २०२४
ठिकाण : आंतरवाली सराटी

राज्य सरकारच्या वतीने मंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी एका महिन्यात 'सगेसोयरे'ची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.

सातवे उपोषण : ९ दिवस

कालावधी : १७ ते २५ सप्टेंबर २०२४
ठिकाण : आंतरवाली सराटी

या आंदोलनात जरांगे पाटील यांनी स्वतः समाजाच्या विनंतीचा मान ठेवत उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे गेले.

आठवे उपोषण : ६ दिवस

कालावधी : २५ ते ३० जानेवारी २०२५
ठिकाण : आंतरवाली सराटी

जालना जिल्हाधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर जरांगे पाटील यांनी सहाव्या दिवशी उपोषण स्थगित केले. आमदार सुरेश धस, बजरंग सोनवणे आणि आमदार प्रकाश साळुंके यांच्या हस्ते त्यांनी उपोषण थांबवले. यावेळी कुणबी प्रमाणपत्र वाटप कक्ष पुन्हा सुरू करण्यासह गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

नववे उपोषण : ५ दिवस

कालावधी : २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२५
ठिकाण : आझाद मैदान, मुंबई

या आंदोलनातून जरांगे पाटील यांनी प्रथमच मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण केले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख आहेत, यांच्यासह मंत्री उदय सामंत, माणिकराव कोकाटे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या शिष्टमंडळाने आझाद मैदानात जरांगे पाटील यांची भेट घेतली.

हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जीआर काढल्यानंतर जरांगे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ज्यूस घेऊन उपोषण सोडले.

दहावे उपोषण : १ दिवस

कालावधी : ३० मे २०२६ सकाळी १० वाजता ते ३१ मे २०२६ पहाटे १ वाजेपर्यंत

या वेळी जरांगे पाटील यांनी उन्हात बसून उपोषण केले. सरकारच्या शिष्टमंडळात असलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत सरकारने जरांगे यांच्या मागण्यांवरून ड्राफ्ट देऊन त्याआधारे शासन आदेश काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी उपोषण सोडले.

अकरावे उपोषण : आता पुन्हा आमरण उपोषण

सुरुवात : २९ ऑगस्ट २०२६
ठिकाण : आंतरवाली सराटी

आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली असून २९ ऑगस्ट २०२६ पासून आंतरवाली सराटी येथे ११व्या आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलन निर्णायक असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे सरकार या आंदोलनावर काय भूमिका घेते आणि पुढील काळात यावर कोणता तोडगा निघतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026