माधुरी हत्तीणीच्या नांदणी मठातील पुनरागमनाची तयारी वेगात; महिनाभरात परतीची शक्यता

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाशी भावनिक नाते जुळलेल्या महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीणीच्या पुनरागमनाची शक्यता अधिक दृढ होताना दिसत आहे.

माधुरी हत्तीणीच्या नांदणी मठातील पुनरागमनाची तयारी वेगात; महिनाभरात परतीची शक्यता

Madhuri Elephant

वनतारा तज्ज्ञांकडून पाहणी पूर्ण; नांदणी मठ, महाराष्ट्र शासन आणि वनतारा यांच्यातील सकारात्मक हालचालींमुळे भाविकांमध्ये उत्साह

कोल्हापूर (Madhuri Elephant) : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाशी भावनिक नाते जुळलेल्या महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीणीच्या पुनरागमनाची शक्यता अधिक दृढ होताना दिसत आहे. पुढील महिनाभरात तिला पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे लाखो भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महादेवी हत्तीणी यापूर्वी ज्या ठिकाणी राहत होती, त्याच परिसरात तिच्या निवासासाठी आवश्यक सुविधा विकसित केल्या जात आहेत. या कामासाठी नांदणी मठ आणि वनतारा यांच्या संयुक्त प्रयत्नांतून नियोजन सुरू असून, सुरक्षितता, देखभाल आणि पुनर्वसनाशी संबंधित बाबींवर विशेष भर दिला जात आहे.

याच अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी वनताराची तज्ज्ञ टीम नांदणी येथे दाखल झाली होती. टीमने दिवसभर मठ परिसरात राहून महादेवीच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्था, निवासाची गुणवत्ता आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची सविस्तर पाहणी केली. सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर संबंधित HPC समोर पाठपुरावा करून महादेवीला पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

दरम्यान, जिनसेन संस्थान मठ नांदणीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमातून या संदर्भातील माहिती भाविकांसोबत शेअर केली आहे. मठाने केलेल्या पोस्टमध्ये महादेवीच्या पुनरागमनाचा मार्ग अधिक सुलभ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पोस्टनुसार, वनतारा टीमने नांदणी येथे मुक्काम करून महादेवीच्या सुरक्षित पुनरागमन आणि पुनर्वसनासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा केली. महाराष्ट्र शासन, नांदणी मठ आणि वनतारा यांच्यात सुरू असलेल्या सकारात्मक संवादामुळे आगामी काळात महादेवीच्या परतीच्या आशा आणखी बळकट झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

मठाच्या माहितीनुसार, पुढील एका महिन्याच्या कालावधीत माधुरी हत्तीणी पुन्हा नांदणीच्या भूमीत दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लाखो भाविकांच्या प्रेमाचे केंद्रबिंदू असलेली ही हत्तीण पुन्हा मठ परिसरात वावरताना पाहण्याची इच्छा सर्व भाविकांनी व्यक्त केली असून, तिच्या पुनरागमनाकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.

नांदणी मठाने शेअर केलेल्या संदेशात ‘आपली लाडकी माधुरी’ आणि ‘भाविकांच्या श्रद्धेचा विजय’ अशा भावना व्यक्त करत महादेवीच्या पुनरागमनासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 03, 2026
 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद; काय आहे कारण?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद; काय आहे कारण?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद करण्याचा निर्णय घेतला.

Oct 02, 2026