Mumbai Protest,

मुंबईत येण्यापासून रोखू नका, अन्यथा सत्ता पाच मिनिटेही टिकू देणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दक्षिण मुंबईतील मोर्चे आणि आंदोलनांसाठी नवे नियम लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत.

मुंबईत येण्यापासून रोखू नका, अन्यथा सत्ता पाच मिनिटेही टिकू देणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दक्षिण मुंबईतील मोर्चे-आंदोलनांबाबत नव्या नियमांनंतर जरांगे आक्रमक; ‘मुंबईत भगवं वादळ धडकणारच’

मुंबई : दक्षिण मुंबईतील मोर्चे आणि आंदोलनांसाठी नवे नियम लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्याला विरोध केला जाईल, असा इशारा देताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला.

जनतेने सत्ता आणि कायदा सरकारच्या हाती दिला असताना त्याच अधिकारांचा वापर जनतेविरोधात केला जात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. ज्यांना आपले मानून सत्तेत बसवले, तेच आता मराठा समाजाला मुंबईत येऊ नका, असे सांगत असल्याची टीकाही त्यांनी केली. मराठा समाजाला रोखण्याचा प्रयत्न झाल्यास सत्ता पाच मिनिटेही टिकू देणार नाही, असा गंभीर इशारा त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला.

यावेळी जरांगे पाटील यांनी मुंबईत मोठ्या संख्येने मराठा समाज येणार असल्याचा दावा केला. मुंबईत ९० लाख मराठे घुसतील आणि यावेळी ४५ लाख गाड्या घेऊन समाज मुंबईत येईल, असे त्यांनी म्हटले. तसेच रेल्वे आणि विमान वाहतुकीबाबतही गंभीर इशारे देत सरकारला आव्हान दिले.

‘मुंबईत भगवं वादळ धडकणारच’

मुंबईत मराठा आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरोधात तीव्र भूमिका घेतली जाईल, असे सांगताना जरांगे पाटील म्हणाले की, मुंबईत भगवं वादळ धडकणारच. आम्हाला कोण अडवते, ते पाहू, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठा समाजाला आंदोलन करण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतल्यास जनतेमध्ये सरकारविरोधात असंतोष वाढेल, असेही त्यांनी म्हटले. ज्या मराठी जनतेने सरकारला सत्तेत बसवले, त्याच जनतेला मुंबईत येण्यापासून रोखले जात असल्याची टीका त्यांनी केली.

आंदोलनासाठी आधीच परवानगी मागितल्याचा दावा

सरकार दादागिरी करत असल्याचा आरोप करताना मात्र आम्ही कायद्याचा आदर करतो, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबईत आंदोलनासाठी येण्याची परवानगी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आधीच मागितली असून, आंदोलनासंदर्भातील निवेदनही देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

परवानगी नाकारल्यास सरकारच कायद्याचा सन्मान करत नसल्याचे सिद्ध होईल, असे ते म्हणाले. मात्र परवानगी मिळो अथवा न मिळो, मुंबईत येण्याचा निर्णय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत जाऊन रात्रंदिवस बसू आणि सरकार आम्हाला कसे रोखते ते पाहू, असे आव्हानही त्यांनी दिले.

मुंबईकरांना दहा-पंधरा दिवस सांभाळून घेण्याचे आवाहन

मुंबईत कोणताही अडथळा नको असेल तर सरकारने मराठा समाजाचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. प्रश्न सोडवायचे नसतील तर सत्तेत बसण्याचा अधिकारही नसल्याचे ते म्हणाले.

मुंबईतील नागरिकांना उद्देशून त्यांनी आंदोलनामुळे काही प्रमाणात त्रास होण्याची शक्यता मान्य केली. मात्र दहा-पंधरा दिवस मुंबईकरांनी सहकार्य करावे, आम्ही तुमचेच आहोत, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्र्यांना गंभीर इशारा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा आमच्या नादी लागू नये, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. यापूर्वी आमच्यावर हल्ला झाल्याचा आरोप करत आता आम्ही सावध असल्याचे त्यांनी म्हटले. सरकारने दादागिरी करू नये आणि पोलिसांच्या जीवावर राजकारणाचा खेळ करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

आंदोलन आझाद मैदान, शिवाजी पार्क आणि वर्षा निवासस्थानासमोरही करण्याचा इशारा देताना, जिथे रस्ता दिसेल तिथे आंदोलन करू, असे जरांगे पाटील म्हणाले. मराठा आंदोलन रोखण्याच्या भूमिकेवरून त्यांनी फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026