Shetkari Karjmafi

कर्जमाफीचा एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहता कामा नये; आमदार श्वेता महाले पाटील यांचे निर्देश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींची आमदार श्वेता महाले पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे.

कर्जमाफीचा एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहता कामा नये; आमदार श्वेता महाले पाटील यांचे निर्देश

Shetkari Karjmafi

आधार प्रमाणीकरण, जॉइंट अकाउंट, फार्मर आयडीसह शेतकऱ्यांच्या सर्व तांत्रिक अडचणी तातडीने सोडविण्याच्या सूचना

चिखली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींची आमदार श्वेता महाले पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्यासोबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाला स्पष्ट आणि सक्त निर्देश दिले.

कर्जमाफीच्या पहिल्या यादीत चिखली विधानसभा मतदारसंघातील तब्बल ११ हजार ८११ शेतकरी पात्र ठरले आहेत. कर्जमाफीसाठी कर्ज घेतलेल्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याचा समावेश झाला पाहिजे. तांत्रिक कारणांमुळे एकही पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहता कामा नये, अशी ठाम भूमिका आमदार महाले यांनी बैठकीत मांडली.

कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या कोणत्याही शेतकऱ्याच्या बँक खात्यावर होल्ड लावू नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. कर्जमाफी झाल्यानंतरही खात्यावर होल्ड असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या पैशांचा वापर करता येत नसेल, तर ही बाब अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कर्जमाफीच्या प्रक्रियेत आधार प्रमाणीकरण न झालेल्या १ हजार ७५१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार श्वेता महाले यांनी केल्या. संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान, अनेक कर्जदार शेतकऱ्यांची खाती जॉइंट अकाउंट असल्याने कर्जमाफीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. विशेषतः पती-पत्नीच्या संयुक्त खात्यांच्या प्रकरणांमध्ये केवळ तांत्रिक कारणांमुळे पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याची मागणी त्यांनी केली.

फार्मर आयडी नसणे, मृत कर्जदार शेतकऱ्यांच्या वारसांच्या KYC संदर्भातील अडचणी तसेच इतर तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देशही आमदार श्वेता महाले यांनी दिले. याशिवाय कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम आणि कर्जमाफीच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याच्या मुद्द्याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

कर्जमाफीच्या प्रक्रियेत होणारा विलंब किंवा तांत्रिक अडचणींचा परिणाम शेतकऱ्यांच्या सिबिल स्कोअरवर होता कामा नये, असा महत्त्वपूर्ण मुद्दा आमदार महाले यांनी उपस्थित केला. शेतकऱ्याची कोणतीही चूक नसताना कर्जमाफी प्रक्रियेतील विलंबामुळे त्याची पत खराब होणे अन्यायकारक असल्याचे सांगत, अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पीएम किसान सन्मान निधी योजनेतील मृत लाभार्थी शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ मिळण्यास होणारा विलंब हाही मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. मृत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद आणि आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून त्यांना योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळवून द्यावा, अशा सूचना आमदार श्वेता महाले यांनी केल्या.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष लाभ संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतो आहे की नाही, याची खात्री करावी, अशी स्पष्ट भूमिका आमदार श्वेता महाले पाटील यांनी घेतली. कर्जमाफीच्या प्रक्रियेत येणाऱ्या प्रत्येक तांत्रिक अडचणीचा निपटारा करून पात्र शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 03, 2026
 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद; काय आहे कारण?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद; काय आहे कारण?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद करण्याचा निर्णय घेतला.

Oct 02, 2026