शिवसेना पक्ष सुषमा अंधारे

‘मुश्रीफ साहेब, खलनायकांच्या यादीत जाऊ नका!’; सुषमा अंधारेंचा टोला

Shiv Sena Sushma Andhare: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गोकुळमध्ये मतदानाचा अधिकार असलेले चार शासननियुक्त

‘मुश्रीफ साहेब, खलनायकांच्या यादीत जाऊ नका!’; सुषमा अंधारेंचा टोला

(Sushma Andhare)

गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून राजकीय वातावरण तापले

कोल्हापूर/ मुंबई (Sushma Andhare) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गोकुळमध्ये मतदानाचा अधिकार असलेले चार शासननियुक्त संचालक नेमण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयावरून महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार धनंजय महाडिक आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर टीका केली.

‘लोकशाही मार्गाने निवडणूक जिंकणाऱ्यांना पेचात टाकू नका’

सुषमा अंधारे (Sushma Andhare)  यांनी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना उद्देशून, “देवेंद्र फडणवीस किंवा धनंजय महाडिक यांच्याकडून आम्हाला फार अपेक्षा नाहीत; पण मुश्रीफ साहेब, तुमची प्रतिमा अत्यंत समंजस आणि सुसंस्कृत नेत्याची राहिली आहे. सतेज पाटील यांनी लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून विजय मिळवला असताना, रडीचा डाव खेळून त्यांना अडचणीत आणू नका,” असे आवाहन केले. तसेच, या प्रकरणात सत्तेचा वापर करून लोकशाही प्रक्रियेत अडथळे निर्माण केल्यास हसन मुश्रीफ यांनाही खलनायकांच्या यादीत जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या विधानामुळे गोकुळच्या राजकारणातील संघर्षाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

गोकुळमधील शासनाच्या हस्तक्षेपावरून वाद

गोकुळच्या अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे संघातील सत्तासमीकरणांवर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका विरोधकांकडून मांडली जात आहे.

सुषमा अंधारे (Sushma Andhare)  यांनी सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी विविध राजकीय डावपेचांचा वापर होत असल्याचा आरोप केला. गोकुळच्या कारभारात शासनाचा हस्तक्षेप वाढत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. शासननियुक्त संचालकांच्या निर्णयावर सत्ताधारी आणि विरोधकांची भूमिका काय राहते, तसेच या निर्णयाचा अध्यक्ष निवडीवर नेमका काय परिणाम होतो, याकडे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.