पहिल्या हप्त्याचे वितरण
औंढा नागनाथ (PM Awas Yojana) : पंचायत समिती सभागृह येथे आज दिनांक 22 फेब्रुवारी शनिवार रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ग्रामीण भाग दोन अंतर्गत तालुक्यातील (PM Awas Yojana) घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र व पहिल्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण पार पडले आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री ग्रामविकास व पंचायत राज यांच्या उपस्थितीत हा ऑनलाइन कार्यक्रम पार पडला असून या कार्यक्रमाचे ऑनलाइन थेट प्रक्षेपण औंढा नागनाथ पंचायत समिती सभागृह येथे करण्यात आले होते तालुक्यात ९५८६ घरकुलाची उद्दिष्ट होते त्यापैकी 8504 घरकुलांना मंजुरी दिली असून 4732 घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता ऑनलाईन पद्धतीने प्रती एका (PM Awas Yojana) लाभार्थ्याला पंधरा हजार रुपये हप्ता देण्यात आला आहे.
यावेळी कार्यक्रमास संजय दराडे. साहेबराव देशमुख, आदित्य आहेर ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे पाटील,सहाय्यक गटविकास अधिकारी बालाजी गोरे, सहाय्यक लेखा अधिकारी कैलास इंगोले राधेश्याम फरंडकर विस्तार अधिकारी सय्यद जमीर (PM Awas Yojana) घरकुल विभागाचे अभियंता गजानन येडमेवार, अक्षय गांजरे राजेश सोनेकर संजय सावंत यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.