निरोप समारंभ कार्यक्रमात सत्कार
हिंगोली (Hingoli District Police) : अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांची नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे बदली झाल्याने ७ जुलै रोजी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. या निमित्त निरोप समारंभ कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात (Hingoli District Police) जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी अंबादास भुसारे, राजकुमार केंद्रे, सुरेश दळवे, प्रभारी गृहपोलिस उपाधिक्षक प्रेमकुमार माकोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पोलिस अधिकार्यांची उपस्थिती होती. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांना निरोप देण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून सर्वांच्या सहकार्याने हिंगोली जिल्ह्यातील कारर्कीद यशस्वी पार पडल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात (Hingoli District Police) जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक बद्रिनाथ सानप यांच्यासह पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, संदिप मोडे, मोहन भोसले, शामकुमार डोंगरे, पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, शालिनी नाईक, गणपत राहीरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, दिपक मस्के, विनोद झळके, रामदास निरदोडे, संग्राम जाधव, गजानन बोराटे, अशोक घारगे, विकास आडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप मोरे यांच्यासह जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयातील कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.