परभणी तालुक्यातील नांदगाव बं. येथील घटना!
परभणी (Beating) : परभणीतील ताडकळस येथे माझ्याकडे काय बघतोस, असे म्हणत गैरकायद्याची (Illegality) मंडळी जमवून तुंबळ मारहाण करण्यात आली. ही घटना परभणी तालुक्यातील नांदगाव बं. येथे घडली. या प्रकरणी 17 जुनला परभणीच्या ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणीच्या ताडकळस पोलिसात नोंद!
राजू प्रल्हाद जल्हारे यांनी तक्रार (Complaint) दिली आहे. फिर्यादी हे मुलाला सोबत घेऊन जारचे पाणी आणण्यासाठी दुचाकीवर गेले होते. घराकडे येत असताना त्यांना समोरुन भावकीतील अनिल जल्हारे येताना दिसला. त्याने फिर्यादीकडे पाहून माझ्याकडे काय बघतोस, असे म्हणत शिवीगाळ करुन कॉलर धरली. थापडबुक्क्यांनी मारहाण (Slapping) केली. त्यानंतर संबंधितांनी दुपारच्या सुमारास आपल्या इतर नातेवाईकांना बोलावून फिर्यादी, त्यांच्या परिवारातील सदस्यांना लोखंडी रॉड, काठ्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केले. शिवीगाळ (Abuse) करत जीवे मारण्याची धमकी (Threat) दिली. या प्रकरणी अनिल जल्हारे, विश्वनाथ जल्हारे, काशिनाथ जल्हारे, रोहन जल्हारे, विजय जल्हारे, रमेश जल्हारे, वाघोबा जल्हारे, नवनाथ जल्हारे, उत्तम जल्हारे, अशोक जल्हारे, अदिनाथ जल्हारे, रोहित जल्हारे, रंजना जल्हारे, गिरीजा जल्हारे, अनुसया जल्हारे, सुशिला जल्हारे यांच्यावर गुन्हा नोंद (Crime Record) झाला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.