४८ विद्यार्थिनींना सायकलचे वाटप!
मानोरा (Bicycle Distributionl) : स्थानिक एल. एस. पी. एम. हायस्कूल (L. S. P. M. High School) व ज्यू कॉलेज धामणी मानोरा येथे मानव विकास मिशन अंतर्गत दि. २६ ऑगस्ट रोजी संस्थेचे अध्यक्ष व्हि. बि. पाटील यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. मागील सत्र २०२४-२५ मध्ये वर्ग आठवीत असणाऱ्या व या सत्रात इयत्ता नववीमध्ये असणाऱ्या विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत हा सायकल वाटप कार्यक्रम पार पडला. या योजने अंतर्गत निकषास पात्र अशा एकूण अठ्ठेचाळीस विद्यार्थिनीं (Student) या शाळेतून लाभार्थी ठरल्या आहेत.
शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी अथक परिश्रम घेतले!
याप्रसंगी प्राचार्य संजय हांडे, प्रा वानखडे, प्रा. राठोड, प्रा डेरे, शिक्षक गोपाल ठाकरे, प्रवीण ढबाले, शिक्षिका प्रभा देशमुख, वंदना पाटील, प्रा मंजुषा मोहोड, पल्लवी बासटवार, शिक्षकेत्तर कर्मचारी सुनील वासनिक व सचिन सोनाने आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी अथक परिश्रम घेतले.