छत्रपती संभाजी नगरात घेतली घर झडती
१० हजाराची स्विकारली होती लाच
हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल
हिंगोली (GST office) : जीएसटी रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी वरिष्ठाकडे पाठविण्या बाबतचा कुरूंदकर फार्मस प्रोड्यूसर कंपनी लिमिटेला दम देऊन १० हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून सदर रक्कम सोमवारी स्विकारणार्या जीएसटी कार्यालयातील अधिक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
केळीचे चिप्स बनवून विक्री करणार्या कुरूंदकर फार्मस प्रोड्यूसर कंपनी लिमिटेला जीएसटी रिर्टन दाखल केले नसल्याने कंपनीचे जीएसटी रजिस्ट्रेशन करण्यात येणार नाही व रजिस्ट्रेशन रद्द करावयाचे नसल्यास १० हजार रूपयाच्या लाचेची मागणी (GST office) जीएसटी कार्यालयातील अधिक्षक वर्ग २ मनोज मधूर मगरे रा.उद्योग सिद्धांत अपार्टमेंट दुसरा माळा प्लॅट क्रमांक ए-७ देवानगरी शहानूरवाडी छत्रपती संभाजी नगर यांनी केली होती. तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्याची पडताळणी होऊन २५ नोव्हेंबरला रामाकृष्णा लॉजच्या खाली असलेल्या हॉटेलमध्ये सापळा रचला.
यावेळी तक्रारदाराकडून १० हजार रूपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मगरे यांना रंगेहात पकडले. सदर प्रकरणी (GST office) हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील अधिक्षक वर्ग-२ मनोज मगरे याला हिंगोलीतील न्यायालयात मंगळवारी हजर करण्यात आले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक विकास घनवट हे करीत आहेत.
अधिक्षकाच्या छत्रपती संभाजीनगरातील राहत्या घराची झडती
हिंगोलीतील जीएसटी कार्यालयातील अधिक्षक वर्ग-२ मनोज मगरे यांनी सोमवारी १० हजार रूपयाची लाच स्विकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. त्यामुळे मगरे यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील उद्योग सिद्धांत अपार्टमेंट दुसरा माळा प्लॅट क्रमांक ए-७ देवानगरी शहानूरवाडी येथील निवासस्थानाची घरझडती छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे यांच्यासह पथकाने घेतली. या (GST office) घरझडतीत काही बाबी पथकाच्या हाती लागल्या किंवा नाही याबाबत मात्र माहिती प्राप्त होऊ शकली नाही.