Parbhani Crime :- शहरातील शंकर नगर भागात चोरट्याने घरफोडी करत ७० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने (Gold ornaments) लंपास केले. ही घटना १२ सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात चोरट्यावर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सुलोचना शेलार यांनी तक्रार दिली आहे. अज्ञात चोरट्याने ३० ऑगस्टच्या सकाळी नऊ ते १२ सप्टेंबरच्या सकाळी आठ या दरम्यान फिर्यादीच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत लाकडी कपाटामध्ये ठेवलेले ७० हजार रुपये किंमतीचे जुने वापरते दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण चोरुन नेले. घरफोडीची माहिती नवा मोंढा पोलिसांना (police station)देण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोउपनि. ननवरे करत आहेत.