Kurkheda :- स्थानीक पोलीस ठाण्याच्यावतीने काल १० ऑगस्ट रोजी मुख्य बाजारपेठेच्या मार्गावर विनापरवाना अल्पवयीन दूचाकी चालका विरोधात नाकाबंदी मोहीम राबवत ३ अल्पवयस्क दूचाकी चालकांना पकडत वाहन जप्त केले व त्यांच्या पालका विरोधात गुन्हा (Crime) दाखल केला. यामुळे पालक धास्तावले आहेत.
दूचाकी चालका विरोधात नाकाबंदी मोहीम राबवत ३ अल्पवयस्क दूचाकी चालकांना पकडत वाहन जप्त
शहरात अपघाताचे (Accident) प्रमाण वाढत आहे .याकरीता सूसाट वेगाने वाहन चालविणारे व अल्पवयस्क वाहनचालक मोठ्या प्रमाणात जबाबदार राहत असल्याची बाब निदर्शनात आल्याने काल शहराच्या मध्यभागी असलेल्या फव्वारा चौकात नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. ३ अल्पवयस्क विनापरवाना दूचाकी चालकांना पकडत वाहन जप्त करण्यात आले. त्यांचे पालक नेताजी ढेलकर(४६) रा.खेडेगांव,सूरेश खोबरागड़े ( ४६) रा.तळेगांव व सूरेश गेडाम( ४२ ) रा.पलसगड यांच्या विरोधात मोटार वाहन कायदा कलम १९९ (अ) अन्वये गुन्हा दाखल केल्याने अल्पवयीन दूचाकी चालक व त्यांच्या पालकात खळबळ माजली आहे .
ही कार्यवाही ठाणेदार महेन्द्र वाघ यांच्यानेतृत्वात साहायक पोलीस निरीक्षक प्रियंका आघाव, पोलीस उपनिरीक्षक संदिप ताराम ,पोलीस उपनिरीक्षक देवराम सहारे , पोलीस हवालदार कालीदास मडावी, राजकूमार ढोरे व कूरखेडा पोलीस चमूने केली. नागरीकांनी अल्पवयीन पाल्यांना दूचाकी चालविण्याकरीता देऊ नये तसेच वैध चालक परवाना व दस्तावेज शिवाय वाहन चालविण्यात येऊ नये ,वेगाची मर्यादा पाळावी असे आवाहन ठाणेदार महेन्द्र वाघ यांनी केले आहे.