लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती व स्व. धर्मदास भिवगडे यांचे चतुर्थ पुण्यतिथी कार्यक्रम
कन्हान (Umang Kala Mahotsav) : विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान जि. नागपुर व्दारे कलावंताची दिंडी यात्रा काढुन कुल दिप मंगल कार्यालय जे एन रोड कन्हान येथे लोकशा हिर अण्णाभाऊ साठे जयंती व स्व. धर्मदास भिवगडे यांचे चतुर्थ पुण्यतिथी कार्यक्रमांतर्गत पत्रकाराकांचा सत्कार करून ग्रामिण लोककलावंतानी विविध ग्रामिण लोककला सादर करून लोककलावंतांचे स्नेहमिलनासह (Umang Kala Mahotsav) उमंग कला महोत्सव व सत्कार सोहळा थाटात साजरा करण्यात आला.
पारंपारिक लोककलेचा सर्वांगिण विकास तसेच नविन पिढीत जागृती करण्याच्या उद्देशाने विदर्भातील सर्व लोककलेच्या पथकांना मंच मिळवुन देत लोकक लावंताच्या पारंपारिक लोकलेचा प्रचार, प्रसार व ग्रामि ण लोककलेची जोपासना करून जतन व्हावे. यास्तव सतत कार्यरत आणि शासनाच्या विविध योजना राब विणा-या विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान व्दारे रविवार (दि.१०) ऑगस्ट २०२५ ला सकाळी ११ वाजता महामार्गाने दिंडी यात्रा काढुन कुलदीप मंगल कार्यालय जे एन रोड कन्हान येथे पोहचुन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शाहिर धर्मदास भिवगडे यांच्या चतुर्थ पुण्य तिथी कार्यक्रमांतर्गत उमंग कला महोत्सव (Umang Kala Mahotsav) व सत्कार सोहळा मा. नरेश बर्वे अध्यक्ष इंटक युनियन नागपुर क्षेत्र तथा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी जिल्हा नागपुर यांचे अध्यक्षेत तर मा. शंकर भाऊ चंहादे माजी समाज कल्याण सभापती व माजी नगराध्यक्ष कन्हान यांचे हस्ते उद्घाटन करून उमंग महोत्सवाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष मा. मनिष भिवगडे, सचिव मा. अलंकारजी टेंभुर्णे प्रमुख अतिथी पत्रकार मोतीराम रहाटे, कमलसिंह यादव, वि.शा.क.प महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वसंता कुंभरे, विदर्भ प्रमुख यादोव राव कान्होलकर, नागपुर जिल्हाध्यक्ष दयाल कांबळे, वर्धा जिल्हाध्यक्ष हरिचंद्र कार्लेकर, मानधन समिती सदस्य आनंद खडसे आदीच्या प्रमुख उपस्थित पत्रका र बांधवांचा व प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. तदंतर भजन, किर्तन, दंडार, डहाका, भारुड, गोंधळ, नाटक, भिमगित, तमाशा, आदिवासी नृत्य, खडी गम्मत सह विदर्भातील सर्व लोककलेच्या कलावंतानी आपल्या कलेचे सुंदर सादरीकरण करून भव्य ग्रामिण लोककलावंताचा मेळाव्यासह (Umang Kala Mahotsav) उमंग कला महोत्सव व सत्कार सोहळा थाटात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे अश्विन भिवगडे, चुडामण लांजेवार , अरुण वाहणे, नामदेवर ठाकरे, रामनाथ पारधीकर, शंकर रामटेके, श्रीकांत रामटेके, गायक अरुण सहारे, पत्रकार युवराज मेश्राम, रोशन कांबळे, प्रफुल्ल भुजा डे, ज्ञानेश्वर तायवाडे, सुधाकर खजुरीये, पुरुषोत्तम निघोट, मिलिंद खोब्रागडे, अमोल रंगारी, शंकरराव होले, शंकरराव श्रीखंडे, राजेश श्रीखंडे, वसंता हुंडे रामटेक, कृष्णाजी भिवगडे, रामभाऊ धनजोडे, माया गणोरकर, विद्या लंगडे, संगिता भक्ते, ज्योती वाघाये, सोनाली गोंडाणे, हेमलता नासरे, सुनंदा ठाकरे, श्रद्धा कांबळे, चंद्रकला वाघमारे, आशा मेंढे, दुर्गा नासरे, निर्मला रेवतकर, संगिता वाडयुधे, उर्मिला वाडी, पुष्पा लोनगाडे, सुलोचना ठाकरे, सुनंदा मोहितकर, सुमित्रा तायडे, उर्मिला तेलंगराव, संगिता बाळबुधे सह विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या पुरुष व महिला प्रतिनिधी व पदाधिका-यानी सहकार्य केले.