निहिदालखमापूर ग्रामपंचायत ने घेतला ठराव
बार्शीटाकळी (Barshitakali Drought) : निहिदा लखमापूर गावासह बार्शीटाकळी तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर करा. अशा प्रकारचा ठराव निहिदा व लखमापूर ग्रामपंचायतने घेतला आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील निहिदा व लखमापूर ग्रामपंचायत मध्ये मंगळवार दिनांक 30 सप्टेंबरला गावच्या सरपंच सौ रेखाताई रुपराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभा पार पडली. सदर सभेला उपसरपंच राजनंदिनी कैलास इंगळे, सचिव तृप्ती पाटील, ग्रामपंचायत सदस्य संगीता ताई प्रल्हाद हागे, मीनाताई अविनाश ठाकरे, पंडित भीमराव ठाकरे, श्रीकांत गुणवंत सोनटक्के, चव्हाण ताई, पोलीस पाटील सरिता विजय ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रुपराव मारुती ठाकरे, तंटामुक्ती अध्यक्ष परलाद हरिभाऊ हागे, अविनाश पाटील ठाकरे, विजय भास्कर ठाकरे यांच्यासह गावातील अनेक जण उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायतच्या मासिक सभेतील ठराव क्रमांक पाच वर, दिनांक 26 ते 27 सप्टेंबर या कालावधीत निहिदा,व लखमापूर गावात पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. तसेच (Barshitakali Drought) बार्शीटाकळी तालुक्यात शेतकऱ्यांच्या जमिनीसह पिकांचे नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारचा ठराव घेतला आहे.