Kailash Mansarovar Yatra

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप; मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने सागाहून काठमांडूकडे रवाना

कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून भारताकडे परतणाऱ्या महाराष्ट्रातील ३७ भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप; मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने सागाहून काठमांडूकडे रवाना

Kailash Mansarovar Yatra

नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तिबेटमध्ये अडकलेल्या भाविकांसाठी महाराष्ट्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाची तातडीने मदत

कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून भारताकडे परतणाऱ्या महाराष्ट्रातील ३७ भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तिबेटमधील सागा येथे अडकलेल्या या भाविकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानंतर आज सकाळी न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे रवाना करण्यात आले. नेपाळमध्ये निर्माण झालेल्या गंभीर पूरपरिस्थितीमुळे त्यांचा परतीचा प्रवास अडचणीत आला होता.

ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे ३७ भाविक **‘जय गिरनारी ट्रस्ट’ (अलिबाग)**चे प्रमोद केणे यांच्यासोबत कैलास मानसरोवर यात्रेला गेले होते. यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर भारतात परतताना त्यांचा ताफा तिबेटमधील सागा परिसरात अडकला.

या सर्व भाविकांचे भारतात परतण्यासाठी काठमांडू येथून विमान २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता नियोजित आहे. त्यामुळे त्यांना निर्धारित वेळेत काठमांडू गाठणे आवश्यक होते. मात्र, नेपाळमधील पूरस्थिती आणि प्रवासातील अडथळ्यांमुळे त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली होती.

मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीने दखल

भाविक अडकल्याची माहिती या समूहातील नितीन शिर्के आणि राकेश जितेकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी तातडीने संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून भाविकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी (MEA) समन्वय साधत आवश्यक मदतीसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानेही तातडीने हालचाली करून आवश्यक परवानग्या आणि मदत उपलब्ध करून दिली.

या प्रयत्नांनंतर सागा येथे अडकलेले सर्व ३७ भाविक न्यालम चेकपोस्ट मार्गे काठमांडूकडे सुरक्षितपणे रवाना झाले आहेत. नियोजित वेळेत काठमांडू विमानतळ गाठून ते २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजताच्या विमानाने भारताकडे परतण्याची अपेक्षा आहे.

संकटाच्या काळात तातडीने मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल भाविक आणि त्यांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र शासन तसेच केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे आभार मानले आहेत.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 03, 2026