प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचा पुढाकार
आखाडा बाळापूर (Professional Teachers Association) : कळमनुरी तालुक्यातील कयाधू नदीच्या काठच्या गावात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व कयाधू पुरामुळे आतोनात नुकसान झाले होते. या नुकसान ग्रस्त भागातील तिन गावात सामाजिक बांधिलकी जोपासत प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन, (Professional Teachers Association) महाराष्ट्र राज्य या संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रात पाच लाख रूपयाच्या किट्स वाटप केले आहे. यात धुळे जिल्ह्या पीटीए ने हिंगोली व परभणी जिल्हा स्वतंत्रपणे किट्स वाटप केले असल्याचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. रामभाऊ कोळपे यांनी आज सांगितले.
यात कळमनुरी तालुक्यातील कयाधू काठच्या कस्बेधावंडा, येलकी वस्ती शाळा, डोंगरगाव पुल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 300 विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक कंपास बॉक्स, अर्धा डझन वह्या, एक पैडच वाटप धुळे जिल्हा पीटीए पदाधिकारी गिरीश सांळुके, अविनाश सोनवणे, अभिजित सनेर,संजय साटोटे,हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी रामभाऊ कोळपे, सचिन तिवारी, गणेश सरदेशपांडे,भगवान कदम, श्रीकांत नगराळे, गजानन कोदंडे उपस्थित शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शाळेतील शिक्षक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
यंदा दोन महिने सततच्या पावसामुळे व अतिवृष्टी कयाधू नदीस दहा बारा मोठे पुर आले तसेच इतर नदीनाले पुर येउन व पिके पाण्याखाली राहून हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. यामुळे अतिवृष्टी ग्रस्त भागात गरजूंना आवश्यक जमेल तशी मदत देण्यासाठी सामाजिक संस्था, समाजसेवक यांनी पुढे यायला पाहिजे.
-प्रा.रामभाऊ कोळपे, कार्यकारिणी सदस्य, प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य.