देशोन्नती वृत्तसंकलन
वर्धा (Farmers financial assistance) : मागील वर्षी सोयाबीन, कपाशीच्या भावात घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्याअनुषंगाने सोयाबीन, कपाशी उत्पादकांना शेतकऱ्यांकडून (Farmers financial assistance) मदत जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दोन लाख 17 हजार शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे सोयाबीन, कपाशीच्या दरात घट झाली. किमतीत झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक (Farmers financial assistance) शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा शासनाने केली होती.
त्यानुसार राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस, (E Crop Inspection) सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर 0.2 हेक्टरपेक्षा जासत क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील दोन लाख 17 हजार शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भावात झालेल्या (Farmers financial assistance) घसरणीमुळे झालेल्या नुकसानीपोटी काहीशी मदत शेतकऱ्यांना या माध्यमातून होणार आहे.
किमतीतील घसरणीपोटी झालेल्या नुकसानाकरिता हेक्टरी 5 हजारांची मदत
ई पीक नोंदणी असलेल्यांनाच ही मदत मिळणार आहे. राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगाममध्ये ई पीक पाहणी अॅप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्यास पात्र राहणार आहे. (E Crop Inspection) ई पीक पाहणी अॅप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार, त्या प्रमाणात परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय असणार आहे. ही रक्कम (Farmers financial assistance) शेतकऱ्यांच्या आधार लिंक्ड असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे.