हिंगोली (Hingoli Crime) : जिल्ह्यात चार ठिकाणी मारलेल्या छाप्यात जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने गुरूवारी अवैध गुटखा जप्त करून गुन्हे दाखल केले. हिंगोली शहरातील भारतीय विद्या मंदिर जवळ दरबार पानटपरीत पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या विशेष पथकातील निखिल बारवकर यांनी ३० जानेवारीला छापा मारून आदेश खान फेरोज खान पठाण याच्याकडुन १५४० रुपयांचा गुटखा जप्त केला.
गणेशवाडी भागात जिल्हा परिषद प्राथमिळ शाळेजवळील महाकाली दुकानात विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सतिश ठेंगे यांनी मारलेल्या छाप्यात पवन जयप्रकाश यादव रा.रिसाला बाजार याच्याकडुन १८०० रुपयांचा तंबाखु व बिडी, सिगारेट पॉकेट जप्त केले. पोस्ट ऑफिस रस्त्यावरील चौकात अन्ना पान शॉपमध्ये विशेष पथकातील महादु गव्हाणे यांनी छापा मारून जय राजु मोहिते रा.अष्टविनायक नगर हिंगोली याच्याकडुन १५५० रुपयांचा सुर्यछाप तोटा व सिंगारेट पॉकेट जप्त केले. तर कनेरगाव नाका येथे साईराम पानशॉपी मध्ये विशेष पथकातील भुंजग कोकरे यांनी मारलेल्या छाप्यात राजेश भरतलाल साहु याच्याकडुन ६८० रुपयांचा सुर्यछाप तोटा, सिगारेट व गुटखा जप्त केला. या प्रकरणी हिंगोली शहर व बासंबा पोलीसात चौघांवर (Hingoli Crime) गुन्हा दाखल करण्यात आला.