खडकीतनिल गाईची कत्तल!
बार्शी टाकळी (Hunting Wild Animals) : बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा वर्तुळातील खडकी शेत शिवारात नील गाईची शिकार केल्यानंतर मास व पाय जप्त केले होते. यावेळी तीन व्यक्तीला पकडण्यात आल्यानंतर यातील अनेक जण फरार होते. सदर घटनेतील सात व्यक्तींची नावे उघड झाले असून इतर तीन ते चार व्यक्तींची नावे अद्याप पर्यंत उघड झाली नसल्याने उलट सुलट खमंग चर्चा होत आहेत.
तिघांना अटक सात जण फरार, आरोपीत वाढ होण्याची शक्यता?
बार्शीटाकळी तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी धाबा वर्तुळातील जाम भाग एक शेत शिवार खडकी क्रमांक ई,119 मध्ये अवैधरित्या एका नील गाई(मादी)ची फास टाकून शिकार केल्याची घटना 23 सप्टेंबरला घडली. सदर घटनास्थळावर मोहन किसन वाघमारे रा. खडकी, संतोष तुळशीराम फुपुटेव लक्ष्मण बबन तिवालेरा. जाम वसु आरोपी मिळून आले. त्यांच्याजवळ नील गायचे पाय व मास जप्त करण्यात आले. या घटनेत एकूण 13 ते 14 व्यक्तींचा सहभाग असल्याच्या उलट सुलट चर्चा दबक्या आवाजात सर्वत्र होत होत्या. यातील आरोपीचे बयाण घेऊन वन गुन्हा क्रमांक 14 36/15/2025 दिनांक 23 सप्टेंबर वन गुन्हा कायम केला असून त्यांच्या विरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 261 कलम 52 वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9,39,44 गुन्हा दाखल केला होता. यासंदर्भात सदर आरोपीला या. न्यायालयात सदर केले असता तीन दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली होती. तपास करताना या घटनेतील नामदेव शंकर तांबारे, निलेश बेलदार, नामदेव विठ्ठल लोखंडे, वैभव वसंत शिंदे, विनोद तांभारे , प्रकाश रामजी तांभारेरा. जाम नाईक वनिलेश चव्हाणरा. जामु वसु या आरोपीचा सदर वन गुन्ह्यात सहभागीय असल्याचे चौकशीतून समोर आले असून सदर आरोपी फरार असल्याने त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न चालूअसल्याची माहिती सूत्रांनी दिली. बार्शीटाकळी तालुक्यातील अनेक भागात वन्य प्राण्यांच्या कत्तल करण्याच्या घटना रात्रीच्या सुमारास काही टोळ्या अशा प्रकारच्या खुलेआम चर्चा सर्वत्र होत असून वन विभागाने (Forest Department) रात्रीच्या सुमारास सर्वत्र स्वरूपात गस्त घालणं व लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
वनपरिक्षेत्र कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन!
आपल्या परिसरातवन गुन्हा किंवा कोणत्याही वन्यप्राण्याची शिकार होत असल्यास किंवा वन गुन्हा होण्याची घटना निदर्शनास आल्यास किंवा या घटनेतील फरार आरोपी संदर्भात माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांक 1926 वर किंवा वनपरिक्षेत्र कार्यालय बार्शीटाकळी तालुका संपर्क कार्यालय धाबा येथे संपर्क साधण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी (Forest Range Officer) आर आर बोरकर यांनी केले आहे.