नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान अंतर्गत, मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय रुग्णालय व सरकटे प्रतिष्ठान यांचा उपक्रम
हिंगोली (Hingoli Eye Camp) : येथे मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यालय, सरकटे सेवा प्रतिष्ठान, सार्वजनिक दसरा महोत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या (Hingoli Eye Camp) उपक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमास उगम संस्थेचे जयाजी पाईकराव, प्रीतम सरकटे, गौतम खंदारे , अनिकेत तांबिले ,रोहन रामगडे ,मधुकर खंडागळे, रत्नाकर महाजन,मुख्यमंत्री सहायता कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, समाजसेवा अधीक्षक डॉ. संतोष शेंडगे, जिल्हा समन्वयक सोमनाथ वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या (Hingoli Eye Camp) नेत्र तपासणी शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून, गरजूंना मोफत नेत्र तपासणी व पुढील उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हे शिबिर पुढील दोन दिवस सुरू असणार आहे