तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांनी केली पाहणी!
मानोरा (Worm Infestation) : तालुक्यातील फुलउमरी सर्कल मधील शेत शिवारात हुमनी अळीच्या प्रादुर्भावाने (Worm Infestation) नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांच्या नुकसानीची पाहणी दि. 5 ऑगस्ट रोजी तहसीलदार डॉ. संतोष यावलीकर व कृषी अधिकारी उमेश राठोड यांनी केली. फुलउमरी सर्कल सह मानोरा तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याचे (Farmers) सोयाबीन पीक हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने पूर्णपणे नष्ट होत आहे. घातक हुमणी अळी जमिनीत खोलवर आढळत असुन, सोयाबीन झाडाच्या मुळाना फस्त करीत आहे. त्यामुळे झाड पिवळे पडून सोकत असुन, पेरणी केलेले शेतात टप्पाटप्पा पडून शेत रिकामे दिसत आहे.
50 हजार रुपये हेक्टरी अनुदान देण्याची मागणी!
शेत रिकामे होत असल्याने खरीप हंगामात पेरणीला लागवड खर्चही वाया जाण्याची शक्यता सध्या पिकांच्या स्थितीवरुन दिसत आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधीत शेतकऱ्यांनी पिक नुकसानीचा (Crop Damage) पंचनामे करून हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीचे निवेदन देताच तहसीलदार (Tehsildar) व कृषि अधिकारी (Agriculture Officer) यांनी पाहणी केली आहे. यावेळी अनेक बाधीत शेतकरी उपस्थित होते.