साखला प्लॉट, माऊली नगर येथील रस्ते, नाल्यांचा प्रश्न गंभीर!
परभणी (Municipal Commissioner Office) : लेखी आश्वासन दिल्यानंतरही, मागण्या मान्य न करता मुलभुत सुविधा न दिल्याने शिवसेनेच्या वतीने साखला प्लॉट, माऊली नगर येथील नागरीकांनी (Citizens) महापालिका आयुक्त कार्यालयास घेराव घालत गुरुवारी आंदोलन केले.
मनपा प्रशासकांनी मागण्या पूर्ण करण्या विषयी रहिवाशांना आश्वासीत केले!
काही दिवसापूर्वी माऊली नगर व परिसरातील नागरीकांनी मुलभुत सुविधांसाठी रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Aandolan) केले होते. यावेळी मनपातील (Municipality) संबंधित अधिकार्यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिले. लवकरच काम करण्याविषयी सांगण्यात आले. मात्र अद्याप पर्यंत, कोणत्याही प्रकारच्या मुलभुत सुविधेचे काम झालेले नाही. यानंतर संतप्त नागरीकांनी महापालिका आयुक्त कार्यालयास (Office of Municipal Commissioner) घेराव घातला. यावेळी मनपा प्रशासकांनी (Municipal Administrator) मागण्या पूर्ण करण्या विषयी रहिवाशांना आश्वासीत केले. आंदोलनाला अशोक गव्हाणे, अविनाश आवचार, सुनंदा सोनकांबळे, शिल्पा माने, सुनीता वाघमारे, अनिता खेडकर, बन्सी नाईक, शेख नयुम, विजय यादव, वैजनाथ टाक, शेख खदीर, सुभाष गोरे, माऊली जाधव, गिरीष विभुते, अशोक गिराम यांच्यासह परिसरातील नागरीकांनी उपस्थिती होती.