कार्यकारी अधिकारी महेंद्र शिवाजी माने यांची माहिती
आखाडा बाळापूर/हिंगोली (NAFED soybeans) : नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र शासनाच्या हमीभावाने एनसी एफ मार्फत सुरु असून कयाधू शेतकरी उत्पादक कंपनीकडून कळमनुरी बाजार समिती येथे व कृषी विज्ञान केंद्र परिसरात वारंगाफाटा या ठिकाणी सुरू आहे. २५ नोव्हेंबर सोमवार पर्यंत १ कोटा r५९ लाख २८ हजार ३५२ रुपयांची दोन्ही केंद्रात खरेदी झाली असल्याचे कार्यकारी अधिकारी महेंद्र शिवाजी माने यांनी सांगितले.
यात कळमनुरी बाजार समिती केंद्रात ११३ शेतकर्यांचा १६७५ क्विटंल सोयाबीन किंमत ८१ लाख ९४ हजार १०० रूपयाची झाली येथे ८०२ शेतकर्यांनी नोंदणी केली आहे तर वारंगाफाटा केंद्रात ११६शेतकर्यांचा १५८१ क्विटंल सोयाबीन खरेदी झाला. किंमत ७७ लाख ३४ हजार २५२ रुपये येथे ८४९शेतकर्यांनी नोंदणी केली आहे. या (NAFED soybeans) खरेदीसाठी कार्यकारी अधिकारी महेंद्र माने मार्गदर्शनात प्रशांत मस्के, चक्रधर अंभोरे, राघोजी नरवाडे, मारोती कदम, ज्ञानेश्वर माने पुढाकार घेत आहेत.