हिंगोली (Meghna Bordikar) : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर (Meghna Bordikar) ह्या उद्या दि. 13 ऑगस्ट, 2025 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर (Meghna Bordikar) यांनी उद्या दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, कळमनुरी येथे कळमनुरी उपविभागाचा आढावा घेणार आहेत. दुपारी 2 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, वसमत येथे वसमत उपविभागाचा आढावा घेणार आहेत. सर्व संबंधित यंत्रणांनी बैठकीस वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.